Join us  

नेमका कसा असेल 'पुष्पा २' सिनेमा; अभिनेत्री रश्मिका मंदानाने दिलं मोठं अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 1:32 PM

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा २०२१ चा संपूर्ण भारतातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा २०२१ चा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट होता. त्यामुळे संपूर्ण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दबदबा निर्माण केलेला. त्यामुळे लोक या चित्रपटाच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाचे शूटिंग सुरू झालं असून प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. त्यामुळे दुसरा भाग कसा असेल, त्यात काय विशेष आणि वेगळं असेल या गोष्टींचा वेगवेगळया प्रकारे चाहते अंदाज लावत होते. यातच आता या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने 'पुष्पा 2' बद्दल एक मोठं अपडेट शेअर केलं आहे.

'पुष्पा 2' हा 'पुष्पा: द राइज'पेक्षा मोठा असेल असं तिनं सांगितलं आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार रश्मिका म्हणाली, "सिनेमा खरोखर चांगला आहे. आम्ही 50 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून चित्रपट बनवत आहोत आणि अजून बरेच काही करायचं बाकी आहे. परंतु मी सांगू इच्छिते हा सिनेमा पूर्वीपेक्षा चांगला आहे. हा खूप मोठा असणार आहे. यात खूप मेहनत घेतली गेली आहे आणि तपशीलांवर खूप लक्ष दिलं गेलं आहे. प्रत्येक पात्रावर खूप लक्ष दिलं जात आहे'.

याआधीही रश्मिकानं 'पुष्पा 2' वर अपडेट शेअर केलं होतं. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, "पुष्पा 2' च्या गाण्याचे शूटिंग पूर्ण केलं आहे.  आमच्यावर एक जबाबदारी आहे. कारण लोकांना चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. प्रेक्षकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी आम्ही सतत आणि सक्रियपणे प्रयत्न करत आहोत.  ही एक अशी कथा आहे जिला अंत नाही, तुम्ही ती कोणत्याही दिशेने नेऊ शकता'

'पुष्पा: द राइज' 2021 साली रिलीज झाला होता. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं होतं. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. टीमने दुस-या भागाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर 'पुष्पा २' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा अधिकृत टीझरही प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.  पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक सुकुमार यांनी आपल्या प्रेक्षक वर्गाला खिळवून ठेवण्यासाठी स्क्रिप्टवर बरेच काम केले आहे. 

टॅग्स :रश्मिका मंदानासेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाअल्लू अर्जुन