Join us

‘तनिष्क’च्या जाहिरातीवर मराठमोळ्या अभिनेत्रीनंही व्यक्त केले आपले मतं, फोटो शेअर करत सांगितली 'स्मॉल स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 3:15 PM

तनिष्कने आपल्या नव्या ज्वेलरी कलेक्शनच्या प्रचारासाठी गेल्या आठवड्यात एक नवी जाहिरात प्रसारित केली होती. ही जाहिरात प्रसारित होताच त्यावरून वादाला तोंड फुटले होते.

'तनिष्क' या ज्वेलरी ब्रँडच्या एका जाहिरातीवरून असा काही वाद पेटला की, अखेर तनिष्कला आपली ही जाहिरात मागे घ्यावी लागली. या जाहिरातीवरून सोशल मीडिया दोन गटात विभागला गेला. एकीकडे #Boycotttanishk तर दुसरीकडे #ISupporttanishk असे हॅशटॅग ट्रेंड झालेत. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनीही या वादात उडी घेतली.

याच पाठोपाठ मराठी सेलिब्रेटीदेखील याविषयी आपले मत मांडत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका रसिका आगाशे हिनंही स्वत:चं उदाहरण देत एक फोटो शेअर केला आहे. रसिकानं लोकप्रिय अभिनेता मोहम्मद झिशान आयुब याच्याच्याशी लग्नगाठ बांधली होती. सध्या ती तिचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. 

शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिला कुटुंबातील मंडळी ओवाळताना दिसत आहेत. रसिकांने या फोटोला समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. 'मेरी गोदभराई.' असं लिहित तिनं लव्ह जिहादबाबत बोलण्यापूर्वी जरा स्पेशल मॅरेज अॅक्टबद्दल थोडे माहिती करून घेवूया असे लिहीले आहे. कोणत्याही प्रकारच्या द्वेषभावनेनं वक्तव्य करण्यापूर्वी काही गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोणाने पाहणे गरजेचे आहे. असेच या ट्विटच्या माध्यमातून तिने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या रसिकाच्या या ट्विटची बरीच चर्चा होत आहे.

काय आहे वाद 

तनिष्कने आपल्या नव्या ज्वेलरी कलेक्शनच्या प्रचारासाठी गेल्या आठवड्यात एक नवी जाहिरात प्रसारित केली होती. ही जाहिरात प्रसारित होताच त्यावरून वादाला तोंड फुटले होते. 43 सेकंदाच्या या जाहिरातीत मुस्लिम कुटुंबात लग्न करून गेलेल्या हिंदू तरूणीसाठी तिच्या सासरचे लोक हिंदू प्रथेप्रमाणे डोहाळजेवण करण्याचा निर्णय घेतात. तनिष्कने युट्यूबवर ही जाहिरात पोस्ट केली होती. ‘तिच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे माया करणाºया घरात ती लग्न होऊन गेली. तिच्यासाठीच त्यांनी त्यांच्यात सहसा साजरा न होणारा सोहळाही साजरा केला. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीचा हा सुंदर मिलाफ आहे, ’असे ही जाहिरात पोस्ट करताना लिहिण्यात आले होते. 

43 सेकंदांच्या ही जाहिरात तनिष्कचा ‘एकत्वम’ हा ब्रँड प्रमोट करण्यासाठी तयार करण्यात आली होती. मात्र वाढत्या वादानंतर तनिष्कच्या सर्व सोशल मीडिया चॅनेल्सवरून ती हटविण्यात आली आहे. सुरूवातीला तनिष्कने युट्यूब आणि फेसबुकवर कमेन्ट्स तसेच लाइक्स-डिसलाइक्स बंद केल्या. नंतर मात्र त्यांनी ती जाहिरातच काढून घेतली.

टॅग्स :तनिष्क