९०च्या दशकातील लाल दुप्पटेवाली हे गाणं आठवत असेल ना... हे गाणं चंकी पांडे व रितु शिवपुरीवर चित्रीत करण्यात आले होते. हे गाणं आँखे चित्रपटातील आहे. या चित्रपटात गोविंदा मुख्य भूमिकेत होते. रितुने त्यावेळी बरेच हिट सिनेमे केले आहे. मात्र हळूहळू ती बॉलिवूडपासून गायब झाली आहे. आज रितु शिवपुरीचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे.
आँखे चित्रपटानंतर रितु शिवपुरीने बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. त्यात 'हम सब चोर हैं', 'आर या पार', 'भाई भाई', 'हद कर दी आपने', 'लज्जा', 'शक्ति: द पावर' व 'ऐलान' चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटात ती सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेत होती.
काही वर्षे चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावल्यानंतर २००६ साली रितु शिवपुरीने बॉलिवूडला रामराम केलं. त्यानंतर ती विवाहित जीवनात रमली. यादरम्यान तिने चित्रपटात कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील केला. पण नवऱ्याला पाठीत ट्युमर झाला होता त्यामुळे तिला त्यांची काळजी घ्यावी लागली.
२०१४ साली एका मुलाखतीत रितुने कमबॅकच्या चर्चेवर सांगितले की, जेव्हा २००६ साली पंजाबी चित्रपटासाठी १८ ते २० तास काम करून परतायचे त्यावेळी नवरा झोपलेला असायचा. या गोष्टीमुळे रितु त्रस्त झाली होती. करियरच्या चक्करमध्ये कुटुंबाकडे लक्ष देता येत नव्हते. ती पुढे म्हणाली की, मी लकी आहे की माझा नवरा अभिनेता नाही. ते सरळ साधे आहेत आणि त्यांनी कधी माझी तक्रार केली नाही. पण मला अपराधी असल्यासारखे वाटू लागले आणि मी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आणि आणखीन काही वर्षे कुटुंबासोबत व्यतित करण्याचा निर्णय घेतला.
रितूने बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर ज्वेलरी डिझायनर म्हणून काम केले.
रितुने तिची आई अभिनेत्री सुधा शिवपुरी यांच्या पावलावर पाऊल टाकत चालण्याचे स्वप्न पाहू लागली. रितुचे वडील ओम पुरी देखील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता होते.
काही वर्षांपूर्वी रितु शिवपुरीने काही वर्षापूर्वी छोट्या पडद्यावर कमबॅक केले. ती अनिल कपूरचा शो २४मध्ये झळकली होती.
त्यानंतर तिने 'इस प्यार को क्या नाम दूं' च्या दुसऱ्या सीझनमध्ये काम केले होते. या मालिकेत तिची निगेटिव्ह भूमिका साकारली होती.