Join us

Sahar Afsha: "मी आता सारं काही संपवतेय"; इस्लामसाठी अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 21:22 IST

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन अभिनेत्रीची घोषणा

Sahar Afsha: मनोरंजन विश्वात कधी काय घडेल हे सांगणं फार कठीण असतं. मनोरंजन क्षेत्राला अनेक अभिनेत्रींनी अलविदा केल्याच्या घटना घडल्या आहेत. 'दंगल गर्ल' झायरा वसीम आणि सना खान यांसारख्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या नावांचा यात समावेश होतो. या दोघींच्या नंतर आता आणखी एका अभिनेत्रीने मनोरंजन विश्वाला रामराम ठोकला आहे. सहार अफशा असे तिचे नाव असून ती भोजपूरी इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण तिने आता सिनेइंडस्ट्री सोडून स्वतःचा संसार थाटला आहे. सहारने सोशल मीडिया पोस्टद्वारे शोबिज म्हणजे चित्रपटविश्व सोडण्याची घोषणा केली आहे.

अभिनेत्रीने मनोरंजन विश्वाला केलं अलविदा-

कोणतीही अभिनेत्री अभिनयाच्या दुनियेत नाव कमवण्यासाठी खूप मेहनत घेते. पण अशाच वेळी प्रसिद्धी आणि संपत्तीचा हव्यास न धरता सहारने अभिनय क्षेत्र सोडल्याचे जाहीर केले आहे. भोजपुरी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सहार अफशा हिने हे पाऊल अतिशय विचारपूर्वक उचलले असल्याचे सांगितले आहे. सहारने एका इंस्टाग्राम पोस्टवर ही माहिती शेअर केली आहे. अभिनेत्रीने लिहिले की, 'मी ठरवले आहे की मी फिल्म इंडस्ट्री सोडणार आहे. आता त्या मनोरंजन विश्वाशी माझा काहीही संबंध नाही.'

फिल्म इंडस्ट्रीमधून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्रीने अल्लाहचे नाव घेत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. ती लिहिते, 'माझे पुढचे आयुष्य इस्लामच्या शिकवणुकीनुसार आणि अल्लाहच्या अल्हमनुसार जगण्याचा मानस आहे. मी आयुष्यातील चिंता सोडून देत आहे. मला अल्लाहने माफ करावे. मी अल्लाहकडे क्षमा मागत आहे. मी योगायोगाने या इंडस्ट्रीत आले होते. पण आता सर्व काही संपवण्याचा निर्णय मी घेतला आहे. पुढील जीवन अल्लाहच्या नावावर असेल. ग्लॅमरस जीवन सोडून आता फक्त अल्लाहने दाखवलेल्या मार्गावर चालणार असल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीइस्लामबॉलिवूड