Join us

सई ताम्हणकर साईबाबांच्या चरणी, राजकारणाबद्दल दिले खास संकेत, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 5:35 PM

सईनं साईबाबचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही फिल्म इंडस्ट्रीतील अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे,  जिनं स्वतःच्या बळावर यश मिळवलं आहे. सई ताम्हणकर कायमच चर्चेत असते. शिवाय ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांशी संपर्कात असते. आता अभिनेत्रीचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत आणि तेही थेट साईबाबांच्या शिर्डीतून. सई ताम्हणकरने शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. साईभक्‍त असलेली सई अनेकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असते. यावेळी सईनं माध्यमांशी बोलताना राजकारण आणि अपकमिंग प्रोजेक्टवर भाष्य केलं. 

सईनं साईबाबचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली, 'माझ्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला सांगत असतील, अगदी शांत आणि धन्य वाटतं आहे. साई बाबांच्या चरणी आल्यावर कायमचं शांत वाटतं. माणूस ज्या काही शंका आणि विवचंना घेऊन आलेला असतो. तो परत शांत मनाने जातो. तशीच मी पण आले होते आणि मी पण शांत मनाने जाणार आहे. खूप प्रोजक्ट आहेत. पण आज गुरुवार आहे. तर गुरुवारबद्दल बोलूया.  मंदिराची काळजी खूप छान घेतली जाते. स्वच्छता खूप छान आहे. हे पाहून बरं वाटतं. येथे व्यवस्था चांगली असल्यानं भक्तांना मनासारखं दर्शन मिळतं. हा माझा तरी अनुभव आहे'.

नवीन गोष्टींची सुरुवात करताना आपण साई बाबांच्या दरबारात येत असतो. तर काय नवीन आहे का या प्रश्नाला उत्तर देताना सई म्हणाली, 'काही नवीन प्रोजक्ट आहेत. असं म्हणतात की आपण जी पार्थना करतो ती सांगायची नसते. ते फक्त साई आणि सईमध्ये आहे. त्यामुळे मी ते सांगणार नाही. बाकी काही गोष्टी तुम्हाला पाडव्याला कळतील.  माझ्या आणि साईबाबांच्या मनातील गोष्ट आहे'.

राजकारणाबद्दल विचारल्यावर सई म्हणाली, 'जसं एखादा सिनेमा काढल्यावर तो किती कमाई करु शकेल हे सांगता येत नाही. तसेच काही राजकारणाचं आहे. राजकारण हा वेट अँड वॉच'चा गेम आहे. तर आपण ते एन्जॉय करु. राजकारणात नवीन विचारसरणी येत आहे. आपण ज्याप्रमाणे डिझिटल क्षेत्रात घौडदौड करतोय, हे कुठल्याच देशात नाही. तर ही परिस्थिती तरी मला आवडते'. तर ती सई गुढीपाडव्याला काय घोषणा करणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

टॅग्स :सई ताम्हणकरसेलिब्रिटीसिनेमाशिर्डीराजकारण