बॉलिवूडची ही अभिनेत्री सिनेमांपेक्षा अंडरवर्ल्ड डॉनसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली.
संजय दत्तच्या या अभिनेत्रीनं मस्जिदमध्ये जाऊन अंडरवर्ल्ड डॉनसोबत केला होता निकाह
मोनिका बेदी बॉलिवूडमध्ये चित्रपटांपेक्षा कमी आणि अबू सालेमसोबतच्या रिलेशनशीपमुळे जास्त चर्चेत आली आहे. मोनिकाचा जन्म पंजाबमधील होशियारपुरमध्ये झाला आहे. मोनिकाने आपले शिक्षण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले आहे. तिने तिच्या सिनेकारकीर्दीची सुरूवात १९९५ साली तेलगू सिनेमा ताजमहलमधून केली होती. तिचा पहिला मोठा चित्रपट सुरक्षा होता, ज्यात तिच्यासोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता.
बॉलिवूडमध्ये 'आशिक मस्ताने', 'तिरछी टोपीवाले', 'जंजीर', 'जानम समझा करो' आणि 'जोड़ी नंबर १' हे तिचे मोठे चित्रपट आहेत. मोनिका बेदीचे फिल्मी करिअर फार काळ चालू शकले नाही. मोनिका बिग बॉसची एक्स कंटेस्टंटदेखील आहे. मोनिका आपल्या चित्रपटापेक्षा जास्त दाऊदचा डावा हात म्हटल्या जाणाऱ्या अबू सालेमसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली. या प्रेमासाठी तिला तुरूंगातही जावे लागले होते.
फिल्मफेअर डॉट कॉम आणि इंडिया फोरम्स डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या मुलाखतीत मोनिका स्वतः तिच्या आणि अबू सालेमच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते. मोनिका अभिनेत्री आहे, तिला स्टेज शो मध्ये रस असणे स्वाभाविक होते. मोनिकाच्या नुसार, तिने अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचे नाव ऐकले होते पण अबू सालेमबद्दल ती अनभिज्ञ होती. १९९८ साली मोनिका पहिल्यांदा अबू सालेमच्या संपर्कात आली होती.
मोनिका दुबईत होती, तिला दुबईत फोनवरून एका स्टेज शोची ऑफर मिळाली होती. स्टेज शो दरम्यान अबू सालेमने तिला एक व्यावसायिक असल्याचे सांगितले होते. शोच्या आधी अबू नाव बदलून बोलत होता. मात्र त्याच्या बोलण्याचा अंदाज असा होता की ती पहिल्या भेटीतच त्याला पसंत करू लागली होती. मोनिकाच्या नुसार, फोनवर त्यांचे बोलणे होत होते. पण त्यांच्यात काहीतरी कनेक्शन असल्याचे तिला वाटत होते.
मोनिका म्हणाली की, मी कधी विचार केला नव्हता की, कोणत्या व्यक्तीसोबत फोनवर बोलून बोलून त्याला इतके पसंत करू लागेन की त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मी असे म्हणणार नाही की मी त्याच्या प्रेमात पडले होते पण हो मला तो आवडू लागला होता. इतके की त्याच्या फोनची वाट पाहत होते. जर फोन नाही आला तर मी बेचैन व्हायचे. फोनवर बोलताना अबू मला खूप गंभीर आणि स्थायिक व्यक्ती वाटला.
मोनिका बेदी नेहमीच आपल्या मुलाखतीत सांगायची की, अबू सालेमसोबत बरेच वर्ष राहिली, मात्र तिने अबूसोबत लग्न केले नाही. तर अबू सालेमने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले होते की, मोनिकासोबत २००० साली लॉस अँजेलिसमधील एका मस्जिदमध्ये निकाह केला होता.