Join us

इंडस्ट्रीत जातीवाद आहे? अभिनेत्री सविता प्रभुणे म्हणाल्या, 'विशिष्ट आडनावामुळे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 2:49 PM

अभिनेत्री सविता प्रभुणे बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत.

मराठी, हिंदी कलाविश्वातील प्रेमळ आई साकारणाऱ्या अभिनेत्री सविता प्रभुणे (Savita Prabhune) नुकतंच इंडस्ट्रीतील जातीवादावर बोलल्या आहेत. सध्या आडनाव,जात यावर तुम्हाला काम मिळणार की नाही हे अवलंबून असतं. अनेक कलाकारांना तसे अनुभवही आले आहेत. स्ट्रगल करणाऱ्यांना या कारणामुळे नकारही ऐकावे लागले आहेत. सविता प्रभुणे यावर काय म्हणाल्या आहेत वाचा.

'पवित्र रिश्ता'मालिकेत अर्चनाची आई झालेल्या अभिनेत्री सविता प्रभुणे बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत. मराठी मालिका, सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं.  'तारांगण' ला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीत येणाऱ्या अनुभवांवर त्या म्हणाल्या, "नाही मला कधीच हिंदी किंवा मराठी इंडस्ट्रीत असा अनुभव आला नाही. तुम्ही विशिष्ट आडनावाचे आहात म्हणून तुम्हाला काम मिळतंय असं मला कधीच वाटलं नाही उलट मला माझ्या या इंडस्ट्रीचा अभिमान आहे."

हा मुद्दा निघायचा कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनी जातीवादावरुन भाष्य केलं होतं. आडनावामुळे डावललं गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. तर हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापनेही जातीवरुन आलेला अनुभव सांगितला होता.  सविता प्रभुणे सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत काम करत आहेत. 

टॅग्स :सविता प्रभूणेमराठी अभिनेताटेलिव्हिजनसिनेमा