Join us

अभिनेत्री शर्वरीचा खास 'पीसी' क्षण!, 'बंटी और बबली २'मधील बिकनी लूकने सर्वांना करणार घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 15:39 IST

अभिनेत्री शर्वरी लवकरच कौटुंबिक मनोरंजक सिनेमा 'बंटी और बबली २' मध्ये नव्या बबलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

देखणी, नवोदित अभिनेत्री शर्वरी लवकरच कौटुंबिक मनोरंजक सिनेमा बंटी और बबली 2 मध्ये नव्या बबलीच्या भूमिकेत दिसणार असून फिल्मच्या सेटवर प्रियांका चोप्राच्या लूकमधला क्षण जगायला मिळाल्यामुळे ती खूप आनंदात आहे! शर्वरीने सुपर सेक्सी, मेटॅलिक गोल्डन बिकिनी परिधान करून अबू धाबीच्या समुद्र किनाऱ्यावर आपल्या जबरदस्त लूकने सर्व क्रुला चकित केले, तेव्हा सगळ्यांनाच दोस्ताना सिनेमातल्या प्रियांका चोप्राच्या वन-पीस बिकिनीमधल्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या रूपाची आठवण झाली.

शर्वरी म्हणाली, ‘मी कायमच खऱ्या अर्थाने बॉलिवूडची चाहती होते. पहिल्या सिनेमात आपल्याला आकर्षक बॉलिवूड क्वीनसारखे सादर केले जाणार असल्याचे कळल्यावर तर मी खूपच खूष झाले.’

ती पुढे म्हणाली, ‘त्यातही आम्ही गोल्डन बिकिनी परिधान करण्याचे ठरवले तेव्हा माझ्या आनंदात आणखी भर पडली, कारण अशी बिकिनी आपल्या दोस्ताना मधल्या कूल आणि सॅसी प्रियांका चोप्राची आठवण करून देते.

माझ्यासाठी तो ठरला पीसी फॅन गर्ल मोमेंट शूटिंगच्या दिवशी आपण किती आनंदात होतो याचे वर्णन शर्वरीने केले. ती म्हणाली, ‘शूटिंगच्या दिवशी मी हा लूक सादर करण्यासाठी उत्सुक आणि आत्मविश्वासपूर्ण होते. चांगल्या शरीरयष्टीसाठी मी खूप मेहनत घेतली आहे आणि मला अप्रतिम शूटिंग करणाऱ्या सर्वोत्तम लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझ्यासाठी तो पीसी फॅन गर्ल मोमेंट ठरला.’

नव्या बंटी- बबलीच्या भूमिकेत सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरीयश राज फिल्म्सचा बंटी और बबली २ देशभरात १९ नोव्हेंबर, २०२१ रोजी प्रदर्शित होणार असून या पोट धरून हसायला लावणाऱ्या विनोदी सिनेमात बंटी और बबली या चोरट्यांची वेगवेगळ्या पिढीतील जोडी पाहायला मिळणार आहे. या दोन्ही जोड्या एकमेकांविरोधात उभ्या ठाकणार असल्यामुळे सिनेमाची रंगत आणखी वाढेल यात शंका नाही. सैफ अली खान आणि राणी मुखर्जी आधीच्या बंटी व बबलीच्या भूमिकेत दिसणार असून नव्या बंटी- बबलीची भूमिका गली बॉय फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी करत आहेत.बंटी और बबली 2 चे दिग्दर्शन वरूण व्ही. शर्मा करत असून त्यांनी यापूर्वी वायआरआफ फिल्म्सच्या सुलतान व टायगर जिंदा है सारख्या महत्त्वाच्या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्राराणी मुखर्जीसैफ अली खान सिद्धांत चतुर्वेदी