Join us

अभिनेत्री श्वेता शिंदेचे छोट्या पडद्यावर कमबॅक, यासाठी घेते मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 6:21 PM

अभिनेत्री श्वेता शिेंदे आणि 'जय मल्हार' फेम देवदत्त नागेसह एकत्र काम करताना दिसणार आहेत.

‘अवंतिका’ , ‘अवघाची हा संसार’, ‘वादळवाट’ या गाजलेल्या मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली ल्या अभिनेत्री श्वेता शिंदे काही वर्षांपूर्वी अभिनयाकडून मालिका निर्मिती क्षेत्राकडे वळली.  लोकप्रिय मालिका ' लागीर झालं जी’ आणि सध्या सुरु असलेली ‘मिसेस मुख्यमंत्री’ ह्या मालिकांची यशस्वी रित्या निर्मिती केली. मात्र आता श्वेता आपली अभिनयाची आवड जोपासण्यासाठी लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहेत. सध्या ती कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हे जरी गुलदस्त्यात असले तरी ती आता अभिनय करताना रसिकांना पाहायला मिळणार आहे.

अतिशय सुंदर चेहरा आणि तिचा स्वतःवरील आत्मविश्वासामुळे, घरच्यांचा संपूर्ण सपोर्ट नसतानाही तिने या ऑफर्स स्वीकारायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पहिले नाही. अनेक उत्तोमत्तम मालिका आणि चित्रपटांमध्ये अतिशय महत्वाच्या भूमिका करत घराघरात पोहोचली. मालिका निर्मितीमुळे अभिनयासाठी हवा तितका पुरेसा वेळ मिळत नव्हता.

पण आता पुन्हा लवकरच त्या आणि जय मल्हार फेम देवदत्त नागेसह एकत्र काम करताना दिसणार आहेत. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडिया आणि व्हाट्सएपवर भरपूर वायरल होत आहे. ज्यात देवदत्त नागे  जय मल्हार च्या लूकच्या पूर्णपणे विरुद्ध अश्या वेषात दिसत आहे आणि त्याला पोलीस पकडत आहेत तर दुसरीकडे श्वेता तिच्या गळ्यातील मफलर पकडून एक स्मितहास्य देत आहेत.  या नवीन येणाऱ्या या मालिकेत या दोघांची नक्की काय केमिस्ट्री असणार आहे आणि कोणती भूमिका ती साकारणार आहे हे लकरच कळेल.

श्वेताने तिच्या या कमबॅकविषयी सांगितले की आज बऱ्याच वर्षांनंतर मी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करणार आहे. याची मनात थोडीशी धाकधूक आहेच, पण छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याने आनंद सुद्धा खूप आहे. या भूमिकेसाठी माझी तयारी सुरू झालेली आहे. मला वजन कमी करावं लागणार आहे. २ दिवसांपूर्वीच मी डाएट सुद्धा सुरू केलंय. खूप व्यायाम सुद्धा करावा लागणार आहे. व्हॅनिटी व्हॅनवर पुन्हा एकदा नाव बघताना खूपच छान वाटलं. मालिकेचा विषय उत्तम असल्याने काम करायला सुद्धा खूप मजा येईल. प्रेक्षकांना सुद्धा ही मालिका आणि माझी भूमिका खूप आवडेल याची मला खात्री आहे." 

टॅग्स :श्वेता शिंदेदेवदत्त नागे