मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Marathi actress Sai Tamhankar) आज बॉलीवूड चित्रपटांमधूनही तिचं स्थान निर्माण करताना दिसते आहे. मराठीमध्ये तर आजच्या आघाडीच्या नायिकांमध्ये सईचे नाव अग्रक्रमाने घेतले जातेच. पण महाराष्ट्राबाहेरही तिने तिचे अनेक चाहते निर्माण केले आहेत. सईच्या इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री जवळच्या मैत्रिणी आहेत. यापैकीच एका अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. त्या नेहमीच एकमेकींच्या कामाचं कौतुक करत असतात.
सईने मुंबईत तर सोनालीने दुबईत नुकतंच नवं घर खरेदी केलं आहे. दोघींनी आपल्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनालीने शेअर केलेल्या पोस्टवर सई ताम्हणकरने कमेंट केली आहे जी चर्चेत आली आहे. सोनालीने सईला तुझ्या घरी कधी बोलावतेयस असा प्रश्न विचारला आहे. त्यावर सईनेदेखील मजेदार उत्तर दिलं आहे.
सोनालीने शेअर केलेल्या दुबईच्या घरांतील फोटोंवर सईमे क्युटी अशी कमेंट केली होती. त्यावर सोनालीने 'ते सर्व ठीक आहे, पण तू तुझ्या नवीन घरात कधी बोलवतेस ते सांग आधी' असं म्हटलं. यावर सईने तिला 'तुमचं लंडन, दुबई झालं की सांगा मॅडम' असं म्हटलं आहे. त्यावर सोनाली 'राहू दे, राहू दे' असं म्हणत कमेंट केली आहे. सईने हे काय आता? असा प्रश्न विचारला. त्यावर सोनालीने आलेच अशी कमेंट करत विमानाचा इमोजी पोस्ट केला आहे.