गेल्या काही दिवसांतील कोरोनाचे आकडे धडकी भरवणारे आहेत. मनोरंजन विश्वात तर चिंतेचे वातावरण आहे. बॉलिवूड आणि टीव्हीच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आता अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar corona positive) ही सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. स्वरा एकटी नाही तर तिच्या अख्ख्या कुटुंबाला कोरोना विषाणूनं ग्रासलं आहे.
स्वराने सोशल मीडियावर याची माहिती दिली.
‘नमस्कार मित्रांनो, ताप आणि इतर काही लक्षणे जाणवल्यानंतर माझी कोरोना चाचणी करण्यात आली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. कोरोना नियमाचं पालन करत आहे. ताप,डोकेदुखी आणि तोंडाची चव जाणे ही याची लक्षणे आहेत. मी दोन लस घेतल्या आहेत. लवकरच मी ठीक होईन,अशी आशा आहे,’ असं म्हणत स्वराने चाहत्यांना माहिती दिली आहे.’
स्वरा भास्कर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सतत आपले फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते. ती अनेक गोष्टींवर परखडपणे आपलं मत मांडताना दिसून येते.
साऊथ सुपरस्टार महेशबाबूलाही लागण
बॉलिवूडनंतर आता टॉलिवूडमध्ये सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. साऊथ सुपरस्टार महेशबाबूला (Mahesh Babu Covid 19 Positive) कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता महेशबाबूस्वत: आपल्या सोशल मीडियावरून आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना खास आवाहनदेखील केलं आहे.
साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता महेशबाबूने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. महेशने याबद्दलची पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, ‘मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मी सर्व कोरोना नियमाचं पालन करून, होम आयसोलेशनमध्ये आहे. सर्व खबरदारी घेऊनसुद्धा मला कोरोनाची लागण झाली आहे. मी सध्या सर्व नियमांचं पालन करत आहे. शिवाय मी डॉक्टरांच्या सल्ल््यानुसार सर्व उपचार घेत आहे.’