Join us

'हेरा फेरी ३'मध्ये तब्बू दिसणार; पुन्हा एकदा साकारणार 'अनुराधा'? अभिनेत्री म्हणाली-

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:09 IST

हेरा फेरीच्या पहिल्या भागात तब्बूने अनुराधाची भूमिका साकारली होती. 'हेरा फेरी ३'मध्ये तब्बू पुन्हा दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे (hera pheri 3)

'हेरा फेरी ३'ची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी हे त्रिकूट 'हेरा फेरी ३' गाजवायला सज्ज आहे. काहीच महिन्यांपूर्वी 'हेरा फेरी ३'ची अधिकृत घोषणा करण्यात आली. सध्या सिनेमाचं शूटिंग जोरात सुरु आहे. लवकरात लवकर शूटिंग संपवून 'हेरा फेरी ३' आपल्या भेटीला येईल. अशातच 'हेरा फेरी ३'मध्ये तब्बू दिसणार असल्याची शक्यता निर्माण झालीय. तब्बूच्या एका पोस्टमुळे ही चर्चा सुरु झालीय. 

'हेरा फेरी ३'मध्ये तब्बू दिसणार?

'हेरा फेरी' सिनेमाच्या पहिल्या भागात तब्बूने अनुराधाची भूमिका साकारलेली. ही भूमिका आजही अनेकांची फेव्हरेट आहे. 'हेरा फेरी ३' सिनेमात तब्बू दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तब्बूने अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांचा फोटो शेअर करुन कॅप्शन लिहिलंय की, "हेरा फेरी ३ माझ्याशिवाय अपूर्ण आहे." असं म्हणत तब्बूने प्रियदर्शन यांना टॅग केलंय. त्यामुळे 'हेरा फेरी ३'मध्ये तब्बू दिसली तर आणखी मजा येईल, यात शंकाच नाही.

कधी रिलीज होणार 'हेरा फेरी ३'?

'हेरा फेरी ३'मध्ये पुन्हा एकदा राजू, श्याम, बाबूभय्या यांच्या भूमिकेत अनुक्रमे अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. याशिवाय या तिघांसोबत आणखी कोण कलाकार दिसणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. तब्बू जर तिघांसोबत असेल तर मजा येणार यात शंका नाही. सुरुवातीला 'हेरा फेरी ३'चं दिग्दर्शन फरहाद सामजी करणार होते पण आता कॉमेडी सिनेमे दिग्दर्शित करण्यास तरबेज असलेले प्रियदर्शन 'हेरा फेरी ३'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

टॅग्स :बॉलिवूडअक्षय कुमारतब्बूसुनील शेट्टीपरेश रावल