Join us

'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये होणार मंजुळाच्या आईची एन्ट्री; मालिकेत येणार नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 17:28 IST

Tujhech mi geet gaat aahe: मालिकेत होणार प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे तुझेच मी गीत गात आहे. आतापर्यंत या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आले आहेत. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक होत चालली आहे.अलिकडेच या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाली. त्यानंतर आता लवकरच तिच्या आईचीदेखील एन्ट्री होणार आहे.  विशेष म्हणजे मंजुळाच्या आईच्या भूमिकेत एक ज्येष्ठ अभिनेत्री झळकणार आहे.

मंजुळा कामतांच्या घरी आल्यापासून स्वराज कायम तिला आई याच नावाने हाक मारतो. त्यामुळे मंजुळा कधीकधी वैतागते. मात्र, स्वराजचा मामा तिला वैदेहीचा फोटो दाखवून स्वराज तिला आई का म्हणतो यामागचं कारण सांगतो. त्यामुळे मंजुळा थक्क होते.  यामध्येच आता तिच्या आईची मालिकेत एन्ट्री होणार आहे.या मालिकेत मंजुळाच्या आईची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक साकारणार आहेत. उषा नाईक यांनी आजवर अनेक सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे या मालिकेत त्या नेमकी कशा प्रकारची भूमिका साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उषा नाईक या जीवाची होतीय काहिली या मालिकेत झळकल्या होत्या. या मालिकेत त्यांनी भद्रक्काची भूमिका साकारली होती. त्यांनी आजवर अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. सुशीला, हळदीकुंकू, बन्याबापू, देवाशपथ खरं सांगेन, सामना, चांदणे शिंपित जा, माफीचा साक्षीदार या सिनेमात त्या झळकल्या आहेत. अशा चित्रपटातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीउर्मिला कानेटकर कोठारे