Join us

या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा, सोशल मीडियावरसमोर आला पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 11:16 IST

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या साखरपुडा आणि लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या साखरपुडा आणि लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अभिनेता संग्राम साळवी काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. 

अभिनेत्री वेदांगी कुलकर्णीचा पुण्यात साखरपुडा पार पडला आहे. वेदांगीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे, वेदांगीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर  साखरपुडा दरम्यानचे दोन सुंदर फोटो शेअर केल आहेत. नवी सुरुवात असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.  ​सोशल मीडियावर ते व्हायरल होतेयेत. चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतायेत. वेदांगीचा होणार पती कोण आहे याबाबत अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही.   

वेदांगीने झी मराठीवरील सूर राहू देत, साथ दे तू मला मालिकांमध्ये काम केलं आहे.  साथ दे तू मला मालिकेत वेदांगीने प्राजक्ताची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. लंडनाच्या आजीबाई या नाटकात तिने उषा कुलकर्णीसोबत काम केले होते. इन्स्टाग्रामच्या माध्यामातून ती फॅन्सच्या संपर्कात असते आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. 

टॅग्स :टेलिव्हिजनझी युवास्टार प्रवाह