Join us

‘इमेजपेक्षाही मला अभिनय जास्त महत्त्वाचा वाटतो’-राधिका आपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 6:39 PM

अभिनेत्री राधिका आपटे ही सध्याच्या बॉलिवूडच्या गुणी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिचा अभिनय, बोल्डनेस यांवर चाहते फिदा आहेत. आता ती श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधुन’ या चित्रपटात दिसत आहे.

श्वेता पांडेय

अभिनेत्री राधिका आपटे ही सध्याच्या बॉलिवूडच्या गुणी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिचा अभिनय, बोल्डनेस यांवर चाहते फिदा आहेत. आता ती श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधुन’ या चित्रपटात दिसत आहे. श्रीराम राघवन हे तिचे पसंतीचे दिग्दर्शक असल्याचे तिने सांगितले आहे. याशिवाय त्या दोघांमध्ये अनेक बाबींचे साम्य असल्याचं ती सांगते. यानिमित्ताने तिच्याशी साधलेला हा संवाद...

* ‘अंधाधुन’ या चित्रपटाचा प्रस्ताव तुझ्याकडे आल्यावर तुझी प्रतिक्रिया काय होती?- खरं तर मी यापूर्वीही श्रीराम यांच्यासोबत काम केले आहे. यावेळेसही जेव्हा ते भूमिकेसाठी माझ्याकडे प्रस्ताव घेऊन आले तेव्हा मी लगेचच त्यांना होकार दिला. केवळ यामुळेच नव्हे तर चित्रपटाची कथा आणि स्क्रिप्ट खूपच दमदार होती. त्यामुळे मला ही भूमिका माझ्या हातून जाऊ द्यायची नव्हती.

* इतर दिग्दर्शकांपेक्षा श्रीराम राघवन हे किती वेगळे?- प्रत्येक दिग्दर्शकांची काम करण्याची आपली पद्धत असते. श्रीराम यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्यासाठी चित्रपट हे खूपच महत्त्वाचे आहेत. बाकी गोष्टींचा त्यांच्यावर काहीही फरक पडत नाही. त्यांच्यात एक लहान मूल आहे. जे त्यांच्यातील ऊर्जा कमीच होऊ देत नाही. 

* तू भूमिकांची निवड कशी करतेस?- आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात. मी त्यांनाच पहिल्यांदा मुख्यत्वाने स्विकारते. मला आव्हान देणाऱ्या  भूमिका करायला मला आवडतात. 

*  चित्रपट स्विकारण्यापूर्वी कुणाचा सल्ला घेतेस का?- होय, अर्थातच. कारण सेकंड ओपिनियन हे नेहमी महत्त्वाचे वाटते. माझ्या मॅनेजरबरोबरच अनुराग कश्यप आणि श्रीराम राघवन यांचा सल्ला मी घेत असते.

* तू हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेस, अशी चर्चा आहे. किती तथ्य आहे यात?- होय, हे खरे आहे. मी दोन हॉलिवूड चित्रपट केले आहेत. परंतु, त्याबाबतीत अजून काही बोलू शकत नाही. कारण त्यांच्या रिलीज डेट अजून निश्चित नाहीत. पुढील वर्षी त्या प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतात.

* तुला कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला जास्त आवडतात?- मला थ्रिलर प्रकारचे चित्रपट आवडतात. सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये काम करायला आणि पडद्यावर तशी भूमिका साकारायला आव्हान वाटते. विधु विनोद चोप्रा यांचा ‘खामोश’ हा चित्रपट माझ्या आवडीचा आहे.

* वेबसीरिज साकारणाऱ्या  कलाकारांमध्ये तुझे नाव आहे. कसं वाटतंय?- मी इमेज बनवण्यासाठी कुठलंही काम करत नाही. भूमिकांची निवड मी काही निकषांवर करत नाही. माझे काम उत्कृष्ट अभिनय करणे आहे. इमेज चाहते बनवतात.

* ड्रिम रोल किंवा ड्रिम डायरेक्टर ज्यांच्यासोबत तुला काम करायचे आहे?- असा तर कुठला माझा ड्रिम रोल नाही. होय, परंतु, माझ्याजवळ दिग्दर्शकांची लिस्ट आहे, ज्यांच्यासोबत मी काम करू इच्छिते. या लिस्टमध्ये श्रीराम राघवन, अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, जोया अख्तर यांचाही समावेश आहे. कारण यांच्यासोबत मी पुन्हा पुन्हा काम करू इच्छिते. 

टॅग्स :राधिका आपटेअंधाधुनआयुषमान खुराणा