झी मराठी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे. या सोहळ्यात वर्षभरातील उत्तम चित्रपटांना चित्र गौरव पुरस्कार देऊन झी कडून गौरविण्यात येणार आहे. पण, यंदाचा झी चित्र गौरव खऱ्या अर्थाने खास असणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात कोठारे अँड सन्सचा जबरदस्त डान्स पाहायला मिळणार आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
झी मराठीच्या ऑफिशियल सोशल मिडिया हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे लोकप्रिय अशा कजरा रे या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. बंटी और बबली या बॉलिवूड सिनेमातील हे गाणं आहे. सिनेमात या गाण्यावर ऐश्वर्या बच्चन, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन थिरकताना दिसले होते. या लोकप्रिय गाण्यावर झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात आता कोठारे बापलेक थिरकणार आहेत.
महेश कोठारे आणि आदिनाथचा हा डान्स पाहून निवेदिता सराफही थक्क झाल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. झी चित्र गौरव सोहळा शनिवारी, ८ मार्चला संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.