Join us

कोणाच्या आठवणीने व्याकूळ झालाय आदिनाथ कोठारे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 12:35 PM

‘८३’ या चित्रपटाची टीम काही दिवसांपूर्वी पहिल्या शेड्युलच्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना झाली आहे. 

ठळक मुद्देआदिनाथने फादर्स डेच्या निमित्ताने जीजासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत आदिनाथने लिहिले आहे की, मला माझ्या घराची अजिबात आठवण येत नाहीये... खरंच मी माझ्या घराला मिस करत नाहीये. जाऊ दे... आता मी कबूल करतोच मला तुझी खूप आठवण येत आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा ‘८३’ सिनेमा चर्चेत आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची टीम काही दिवसांपूर्वी पहिल्या शेड्युलच्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना झाली आहे. 

या चित्रपटात दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आपल्याला आदिनाथ कोठारेला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू व्हायच्याआधी या चित्रपटाच्या टीमने धर्मशाला येथे क्रिकेटचे धडे गिरवले होते आणि आता याचे चित्रीकरण लंडनमध्ये सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणात तो सध्या व्यग्र असल्याने त्याला त्याच्या कुटुंबियांना वेळ देता येत नाहीये. तो सध्या सगळ्यात जास्त कोणाला मिस करतोय हे त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून सांगितले आहे. आदिनाथने फादर्स डेच्या निमित्ताने त्याची मुलगी जीजासोबत एक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तो आणि त्याची मुलगी मजा-मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहे. या व्हिडिओसोबत आदिनाथने लिहिले आहे की, मला माझ्या घराची अजिबात आठवण येत नाहीये... खरंच मी माझ्या घराला मिस करत नाहीये. जाऊ दे... आता मी कबूल करतोच मला तुझी खूप आठवण येत आहे. 

आदिनाथ आणि त्याच्या मुलीचा हा क्यूट व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे. केवळ १२ तासात या व्हिडिओला ३० हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

आदिनाथ हा ८३ या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे त्यानेच सांगितले होते. या चित्रपटाच्या भूमिकेविषयी बोलताना त्याने म्हटले होते की, या चित्रपटात मी दिलीप वेंसरकर यांची भूमिका साकारणार आहे. मला क्रिकेट हा खेळ लहानपणापासूनच आवडतो. हा खेळ खेळण्यात आणि तो पाहाण्यातच माझे बालपण गेले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी प्रचंड खूश आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बलविंदर सिंग संधू, यशपाल शर्मा, कपिल यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले. 

 

 

टॅग्स :आदिनाथ कोठारे८३ सिनेमारणवीर सिंग