Join us

'प्रेमास रंग यावे' मालिकेत आदिनाथ कोठारेची खास एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 19:29 IST

'प्रेमास रंग यावे' (Premas Rang Yave) प्रेक्षकांना मनोरंजनासोबत एक सामाजिक संदेश देत आहे.

सन मराठीवरील लोकप्रिय मालिका 'प्रेमास रंग यावे' (Premas Rang Yave) प्रेक्षकांना मनोरंजनासोबत एक सामाजिक संदेश देत आहे. या शोमध्ये अमृता फडके ही अक्षराच्या भूमिकेत दिसत आहे, जिथे ती संसार आणि जबाबदारीच्या संघर्षातून मार्ग काढताना दिसत आहे. अमृता हिच्या सशक्त अभिनयामुळे अक्षराची भूमिका अधिक भावपूर्ण वाटते.

या रोमांचक प्रवासात आता आणखी एक आकर्षण म्हणजे अभिनेता आदिनाथ कोठारे याची विशेष एंट्री ह्या मालिकेत होणार आहे . जो त्याचा आगामी चित्रपट पाणी ह्याचे प्रमोशन करताना दिसणार आहे. त्याच्या एंट्रीने प्रेक्षकांची आवड अजून वाढणार आहे. आदिनाथ यांची भूमिका आणि त्यांचा आगामी चित्रपट 'पाणी' याची चर्चा कथेच्या धाग्याशी जोडली जाणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना या भागाची अधिक उत्सुकता लागणार आहे.

'पाणी' सिनेमाबद्दल'पाणी' ही हनुमंत केंद्रे यांची कथा आहे. हनुमंत हे राज्यात 'जलदूत' म्हणून ओळखला जातात.  हनुमंत केंद्रे यांचे मराठवाड्यातील दुष्काळी भागातील अनोखं कार्य या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी' चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी 'पाणी' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 

टॅग्स :आदिनाथ कोठारे