Join us  

आदिनाथचा बॉलीवूड प्रवेश,‘डीअर डॅड’द्वारे नाहीच

By admin | Published: April 27, 2016 2:54 AM

अभिनेता अरविंद स्वामी डीअर डॅड या चित्रपटाद्वारे कित्येक वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करीत आहे.

अभिनेता अरविंद स्वामी डीअर डॅड या चित्रपटाद्वारे कित्येक वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करीत आहे. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारेही काम करत असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. इतकेच काय तर आदिनाथ कोठारेच्या विकिपिडियामध्येही या चित्रपटाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पण आदिनाथच्या फॅन्ससाठी वाईट बातमी आहे. तो या चित्रपटात काम करत नसल्याचे डीअर डॅड या चित्रपटाचे निर्माते शान व्यास यांनी सांगितले आहे. आदिनाथ लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार हे मात्र खरे आहे. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात आदिनाथ झळकणार आहे. महेश मांजरेकर यांचा काकस्पर्श हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता. याच मराठी चित्रपटाचा रीमेक हिंदीत केला जाणार आहे आणि या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिका साकारणार आहे.