नुकताच प्रदर्शित झालेला 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमाचा वाद संपता संपत नाहीए. सिनेमातील काही संवाद हे रामायणाचा अनादर करणारे आहेत. यावरुन प्रेक्षक चांगलेच भडकलेत. संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना सर्वांनी घेरलंय. यानंतर मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी संवाद बदलण्यात येतील असं जाहीर केलं. पण वाढता विरोध पाहता त्यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली. आता मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली असून याबाबत पोलिस तपास करत आहेत.
'आदिपुरुष' सिनेमाचा वाद विकोपाला जाताना दिसतोय. कालच नालासोपारा येथे काही हिंदू संघटनांनी शो बंद पाडला. तर दुसरीकडे मनोज मुंतशीर यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. तसंच संवाद बदलणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तरी फिल्मवर बंदी आणण्याची मागणी आता जोर धरुन आहे. सिनेमातील संवाद असो, व्हीएफएक्स असो किंवा अगदी कलाकारांची निवड सगळंच गंडलं असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. आता लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांची सुरक्षा मिळते का हे बघणं महत्वाचं असणार आहे.
आदिपुरुषची आतापर्यंतची कमाई किती?
१६ जून रोजी रिलीज झालेल्या 'आदिपुरुष' सिनेमाने पहिल्याच दिवशी 86.75 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी कमाईत 24.78 टक्क्याने घसरण झाली. चित्रपटाने 65.25 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी सिनेमाने पुन्हा भरारी घेतली आणि 67 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तीनच दिवसात सिनेमा बॉक्सऑफिसलवर धुमाकूळ घालत 219 कोटींची कमाई केली आहे.