Join us

'संवाद बदलत आहोत पण माफी मागणार नाही', आदिपुरुषचे लेखक मनोज मुंतशीर यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 12:45 PM

पाच वाक्यांमुळे लोकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे.

ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. अगदी टीझर रिलीज झाल्यापासूनच सिनेमावर टीका होत आहे. आदिपुरुषने कोट्यवधींची कमाई केली असली तरी त्यातील संवादांमुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या आहेत. सिनेमातील बहुतांश संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी लिहिली आहेत. त्यांच्यावर सध्या चोहीकडून टीका होत आहे. सिनेमातील डायलॉग्स बदलले जातील मात्र माफी मागणार नाही असं त्यांनी स्पष्टच सांगितलंय.

आदिपुरुष संदर्भातील वादावर मनोज मुंतशीर म्हणाले, 'पाच वाक्यांमुळे लोकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. मी त्यांच्या भावनांचा आदर करतो. पण मी अजिबात माफी मागणार नाही. माफीपेक्षा जास्त मोठं काही असतं का? जेव्हा तुम्ही माफी मागता तेव्हा तुम्ही पुढच्या चुकीची तयारी सुरु करता.'

ते पुढे म्हणाले, 'मी माफीच्या ऐवजी कृती करत आहे. तसंच सिनेमाच्या पटकथेबद्दल बोलत असाल तर त्याबद्दल तुम्ही ओम राऊतला प्रश्न विचारा. आमच्या सिनेमाची कहाणी रामायणावरुन प्रेरित आहे. यातील काही गोष्टी रामायणातून घेतल्या आहेत पण आम्ही पूर्ण रामायण दाखवलेलं नाही.'

एकीकडे आदिपुरुषचा वाद, तर दुसरीकडे रेकॉर्डब्रेक कमाई; तीनच दिवसात 'इतके' कोटी पार

ओम राऊतला विचारा

स्क्रीनप्ले बाबतीत मला प्रश्न विचारु नका. आम्ही संवाद बदलत आहोत त्यामुळे त्याचं तुम्ही स्वागत करा. माझा स्क्रीनप्लेवर विश्वास आहे.जर ओम राऊत यांच्याकडे नक्कीच काही संदर्भ असतील ज्यावरुन त्यांनी स्क्रीनप्ले तयार केला आहे.

टॅग्स :आदिपुरूषप्रभासक्रिती सनॉन