एकीकडे आदिपुरुषचा वाद, तर दुसरीकडे रेकॉर्डब्रेक कमाई; तीनच दिवसात 'इतके' कोटी पार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 11:28 AM2023-06-19T11:28:51+5:302023-06-19T11:32:03+5:30
'आदिपुरुष'चा वाद जितका वाढतोय तितकाच सिनेमाला फायदा होतोय.
रामायणावर आधारित बिग बजेट चित्रपट 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा रिलीज होताच वादात अडकला. सिनेमातील संवादांमुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या. तर रावणाचा लुक, न जमलेलं व्हीएफएक्स अशा अनेक कारणांमुळे सिनेमा ट्रोल झाला. मात्र याचा सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरील कमाईवर काहीच परिणाम झालेला नाही. तिसऱ्या दिवशी सिनेमाने चांगलीच मोठी उडी घेतली.
आदिपुरुषची आतापर्यंतची कमाई किती?
१६ जून रोजी रिलीज झालेल्या 'आदिपुरुष' सिनेमाने पहिल्याच दिवशी 86.75 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी कमाईत 24.78 टक्क्याने घसरण झाली. चित्रपटाने 65.25 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी सिनेमाने पुन्हा भरारी घेतली आणि 67 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तीनच दिवसात सिनेमा बॉक्सऑफिसलवर धुमाकूळ घालत 219 कोटींची कमाई केली आहे.
'आदिपुरुष' 2023 चा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. वर्षाच्या सुरुवातीला हा रेकॉर्ड 'पठाण'च्या नावावर होता. आदिपुरुष रिलीज होताच पठाणचा रेकॉर्ड मोडला. पठाणने तीन दिवसात 166.75 कोटी रुपये कमावले होते तर आदिपुरुषने 200 कोटी पार केले.
'जलेगी तेरे बाप की...' हनुमानाच्या तोंडी असे डायलॉग? लेखक मनोज मुंतशीर म्हणाले, 'वाल्मिकी...'
'आदिपुरुष'चा वाद जितका वाढतोय तितकाच सिनेमाला फायदा होतोय. प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. तर नुकतंच मेकर्सने संवाद बदलणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे यापुढे सुधारित संवादांसह सिनेमा थिएटरमध्ये दाखवण्यात येणार आहे.