Adipurush OTT Release : थिएटरनंतर या OTTवर रिलीज होणार प्रभासचा 'आदिपुरुष', निर्मात्यांनी इतक्या कोटींची केली डील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 02:40 PM2023-06-14T14:40:05+5:302023-06-14T14:41:00+5:30
Adipurush OTT Release : प्रभास आणि क्रिती सनॉनचा आगामी चित्रपट 'आदिपुरुष' गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे.
प्रभास (Prabhas) आणि क्रिती सनॉन(Kriti Sanon)चा आगामी चित्रपट 'आदिपुरुष' (Adipurush Movie) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत, तर रिलीज होण्याच्या फक्त ३ दिवस आधी, चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यापूर्वी निर्मात्यांनी OTT वर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी संपूर्ण करारावर स्वाक्षरी केल्याचे वृत्त समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ५० दिवसांनी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यासाठी निर्मात्यांनी सुमारे २५० कोटींचा करार केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदिपुरुष चित्रपटाच्या रिलीजपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकले आहेत. म्हणजेच आता हा चित्रपट थिएटरमध्ये कमाई केल्यानंतर OTT प्लॅटफॉर्मवर कमाई करेल. निर्मात्यांच्या या निर्णयावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, ६०० कोटींच्या चित्रपटाबाबत कोणालाही कोणतीही जोखीम घ्यायची नाही आणि प्रत्येक प्रकारे या चित्रपटाची किंमत चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वसूल केली जावी, हा प्लान ऑफ अॅक्शन आहे.
अशा परिस्थितीत ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवरून २५० कोटी रुपयांची डील झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेकर्सची ही डील Amazon Prime Video सोबत झाली आहे. बातम्यांनुसार, या चित्रपटाचे केवळ ओटीटी अधिकार विकले गेले नाहीत तर चित्रपटाने संगीत, सॅटेलाइट आणि इतर डिजिटल अधिकार विकून सुमारे ४३२ कोटींची मोठी कमाई केली आहे.
पहिल्याच दिवशी १३० कोटींचा जमवू शकतो गल्ला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपट व्यापार विश्लेषकांनुसार, 'आदिपुरुष' चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात १३० कोटींचा गल्ला जमवू शकतो. विभागणी केल्यानंतर, व्यापार विश्लेषकांच्या मते, पहिल्या दिवशी दक्षिणेत ६५ कोटी, हिंदी भाषेत ३५ कोटी आणि परदेशात सुमारे ३० कोटी जमा होऊ शकतात.