Join us

Adipurush: सैफ अली खानमुळे वादात अडकलेला 500 कोटींचा आदिपुरुष होणार फ्लॉप?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 3:14 PM

प्रभास आणि सैफ अली खानचा बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून वादात अडकला आहे. निर्मात्यांना सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे.

Saif Ali Khan Troll On Raavan Look: प्रभास (Prabhas)आणि सैफ अली खान(Saif Ali Khan) चा बहुप्रतिक्षित "आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून वादात अडकला आहे. टीझर रिलीज झाल्यापासून निर्मात्यांना सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटातील प्रभास आणि सैफ अली खानचा लूक ट्रोल होत आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच निर्माते आणि स्टारकास्टने केलेल्या चुकांमुळे चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसलेल्या VFXवरुन सोशल मीडिया यूजर्सनी चित्रपटाला वाईट पद्धतीने ट्रोल करायला सुरुवात केली आहे. नेटीझन्स चित्रपटातील VFX आणि सैफच्या पात्रावरुन निर्मात्यांना धारेवर धरत आहेत.

आदिपुरुषच्या टीझरमध्ये सैफ अली खानचा लूक पूर्णपणे विचित्र दिसत आहे. रावणाच्या अवतारात सैफचे केस लहान आहेत. त्याने काळ्या रंगाचा पोशाख घातला आहे आणि तो खूपच भयानक दिसतोय. पुष्पक विमानाऐवजी सैफ वटवाघुळ सारख्या प्राण्यावर उडताना दाखवला आहे. त्याचा हा लूक सोशल मीडिया यूजर्सना अजिबात आवडलेला नाही. ट्विटरवर त्याच्या लूकची खिल्ली उडवली जात आहे. त्यामुळे आता  चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच निर्माते आणि स्टारकास्टने केलेल्या चुकांमुळे चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 500 कोटींचा बजेटमध्ये तयार होणार हा चित्रपट फ्लॉप होतोय की काय? अशी भीती वाटतेय. 

टिझर रिलीज झाल्यापासून वादप्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझरची चाहते खूप दिवसांपासून या टीझरची वाट पाहत होते. मात्र टीझर आल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडलं. याचे कारण म्हणजे चित्रपटाचे VFX. आदिपुरुषच्या टीझरमध्ये, प्रभास, प्रभू रामच्या भूमिकेत दिसतोय. तर क्रिती सेनॉन (Kriti Senon) सीतेच्या भूमिकेत दिसतेय. त्यांच्यासोबत वानरसेनाही आहे. ही सर्व दृश्ये एखाद्या अ‍ॅनिमेशन चित्रपटातील वाटत असली तरी लाइव्ह अ‍ॅक्शन फिल्मची नाही. VFX पाहताच युजर्सनी टीझरला ट्रोल करायला सुरुवात केली. दिग्दर्शक ओम राऊत यांनी ही चूक लवकर दुरुस्त करावी, असे यूजर्सचे म्हणणे आहे. अनेक युजर्सनी या टीझरच्या व्हीएफएक्सची खिल्ली उडवली असून याला टेम्पल रन गेम म्हटले आहे. चित्रपटाचे बजेट ५०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. VFX च्या कामावर २५० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. या चित्रपटात प्रभास प्रभू रामांची, क्रिती सनॉन सीतेच्या भूमिकेत आहे. सैफ अली खान, रावण आणि सनी सिंह निज्जर लक्ष्मणच्या भूमिकेत आहेत. आदिपुरुष १२ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

 

टॅग्स :आदिपुरूषप्रभाससैफ अली खान