Join us

“मी हात जोडून माफी मागतो...”; मनसेच्या इशाऱ्यानंतर आदित्य नारायणची फेसबुक पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 7:33 AM

इंडियन आयडल शो चा होस्ट असलेला आदित्य नारायणने अलिबागबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मनसेने त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.

ठळक मुद्देमनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आदित्य नारायण यांना इशारा दिला होता. आदित्यचा उद्धटपणा वाढलाय म्हणत कानाखाली आवाज काढला जाणार - मनसे माझा कधीही कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला अलिबागबद्दल प्रेम आणि आदर आहे.

मुंबई – इंडियन आयडल(Indian Idol 12) शो सध्या विविध कारणावरून चर्चेत आहेत. अलीकडेच किशोर कुमार(Kishore Kumar) स्पेशल एपिसोड शोवरून लोकांनी टीका केली होती. खुद्द किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनीही या एपिसोडनंतर इंडियन आयडल १२ चो पोलखोल केली होती. शूट सुरू होण्यापूर्वीच मला स्पर्धकांचे कौतुक करायचं आहे असं सांगण्यात आला आणि मी तेच केले असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला होता. हा वाद शमत नसतानाचा इंडियन आयडल शो चा होस्ट असलेला आदित्य नारायणने अलिबागबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मनसेने त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आदित्य नारायण यांना इशारा दिला होता. त्यानंतर आदित्य नारायणने फेसबुक पोस्ट करत अलिबागकरांची माफी मागितली आहे. आदित्य नारायण म्हणतो की, मी नम्रपणे हात जोडून अलिबागच्या लोकांची माफी मागतो. माझ्या अलीकडच्या एपिसोडमध्ये मी अलिबागबद्दल जे विधान केले त्यावरून अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा कधीही कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला अलिबागबद्दल प्रेम आणि आदर आहे. माझ्याही अलिबाग ठिकाणाशी अनेक भावना जोडलेल्या आहेत. तिथले लोक आणि मातीचा मला आदर आहे असं त्याने म्हटलं आहे.

काय आहे वाद?

इंडियन आयडलमध्ये होस्ट करणाऱ्या आदित्य नारायणने नुकत्याच पार पडलेल्या भागात शो सुरु असताना एका स्पर्धकाबरोबर बोलताना ''राग पट्टी ठिक से दिया करो, हम क्या अलिबागसे आये है क्या'' ? असे म्हटले होते. आदित्यच्या अशा बोलण्यावरुनच नवा वाद  उफाळला. अलिबागविषयी असे बोलणे रसिकांनाही चांगलेच खटकले आणि आदित्यचे नॅशनल चॅनेवर असे काही बोलण्यावर युजर्सने चांगलाच संताप व्यक्त केला होता.

मनसेचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर(MNS Amey Khopkar) यांनीही आदित्यचा उद्धटपणा वाढलाय म्हणत कानाखाली आवाज काढला जाणार अशा शब्दात आदित्य नारायणला खडसावले होते. हिंदी चॅनेवर अनेकदा कलाकार अलिबागसे आये है क्या म्हणताना दिसतात. अशा लोकांना अलिबागची संस्कृती माहिती नाही? आमच्या अलिबागची लोकं माहिती नाहीय..?''अलिबागकरांचा हा अपमान आहे.ही कोणती बोलायची पद्धत झाली असा संताप त्यांनी फेसबुक लाईव्हवरून व्यक्त केला होता.

 

टॅग्स :आदित्य नारायणमनसेइंडियन आयडॉल