इंडियन आयडल 11ची जज नेहा कक्कर आणि सूत्रसंचालक आदित्य नारायण सध्या दोघे लग्नाच्या बातम्यांना घेऊन चर्चेत आहेत. नेहा कक्करच्या लग्नला आदित्य नारायण जाणार नसल्याची माहिती आहे. नेहा कक्करच्या लग्नाला हजेरी लावण्याच्या प्रश्नावर आदित्य नारायण म्हणाले की, लग्नात जाऊ शकेन की नाही याची मला खात्री नाही.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आदित्य म्हणाला, मला लग्नाला जायला आवडले असते, पण लग्न दिल्लीत होणार आहे. माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे त्यामुळे मी लग्नात सहभागी होईन किंवा नाही याची मला खात्री नाही आहे. विशाल सर, हिमेश रेशमिया हे सर्व लग्नाला म्युझिक रिअॅलिटी शोमधून हजेरी लावतील. आदित्य पुढे म्हणाला, नेहा माझ्या खूप चांगली मैत्रिण आहे आणि मी तिच्यासाठी खूप खुश आहे. मी रोहनला तेव्हापासून ओळखतो जेव्हा तो सा रे गा मा पा लिटिल चॅम्पसचा सेकेंड रनरअप झाला होता. माझे दोन चांगले मित्र लग्न करणार आहेत याचा मला आनंद आहे. "
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. नेहाने काही दिवसांपूर्वीच प्रेमाची कबुली दिली आहे. नेहाने रोहनप्रीतसोबतचा एक फोटो शेअर केला. ‘तू माझा आहेस...,’ असे या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले. सोबत ‘नेहूप्रीत’ असा हॅशटॅगही दिला आहे. रोहनप्रीत म्हणाला, आय लव्ह यू सो मच... नेहाच्या या पोस्टवर रोहनप्रीतनेही कमेंट केली आहे. ‘बाबू, आय लव्ह यू सो मच, मेरा पुत, मेरी जान... हो मी फक्त तुझाच आहे,’ असे त्याने लिहिले आणि सोबत खूप सारे हार्टइमोजीही पोस्ट केलेत.
नेहा कक्करपाठोपाठ आदित्य नारायणनेही दिली प्रेमाची कबुली; या अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ