‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ या रिएलिटी शोचा 25 वर्षांचा वारसा पुढे चालविताना या कार्यक्रमाने देशाला श्रेया घोषाल, कुमार गांजावाला, कमाल खान, अमानत अली, राजा हसन, संजीवनी आणि बेला शेंडे यांच्यासारखे आज नामवंत पार्श्वगायक बनलेले अनेक कलाकार मिळवून दिले आहेत. गेल्याचवर्षी ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या प्रचंड पसंती मिळाली होती. आता पुन्हा एकदा ‘सा रे ग म प’चा नवीन सिझन रसिकांच्या भेटीला येणार आहे.हिमेश रेशमिया, विशाल ददलानी आणि शंकर महादेवन हे नामवंत आणि लोकप्रिय संगीतकार-गायक गुणवान गायकांची निवड करणार आहेत. या सिझनचे सूत्रसंचालन रसिकांचा लाडका गायक आदित्य नारायण करणार आहे.
आदित्यने यापूर्वी 2018 मध्येही या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. शंकर महादेवन आणि विशाल यांच्याप्रमाणेच या कार्यक्रमात पुन्हा परतल्यावर आदित्यने ‘आपण पुन्हा स्वगृही आल्यासारखे वाटत’ असल्याचे म्हटले होते. ‘सा रे ग म प’च्या नव्या सिझनचा सूत्रसंचालक बनल्यामुळे आनंद व्यक्त केला. मी या कार्यक्रमाशी फार दीर्घकाळापासून जोडला गेलो आहे. हा शो म्हणजे माझं दुसरं घरच बनलं आहे. मी 2007 ते 2018 या काळात या कार्यक्रमाच्या तब्बल सात सिझनचे सूत्रसंचालन केलं होतं.
मी जेव्हा फक्त 18 वर्षांचा होतो, तेव्हा सर्वप्रथम मला टीव्हीवर पहिलं काम मिळालं आणि ते म्हणजे सा रे ग म प कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं. तेव्हापासून आजपर्यंतची हा वाटचाल तशीच सुरु असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याचा अनुभव अधिक रंजक असेल, याची मला खात्री आहे.”
या कार्यक्रमातील परीक्षकांबाबत आदित्य नारायण म्हणाला, “माझी आठवण जर बरोबर असेल, तर सा रे ग म प कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनलाही विशालसर आणि हिमेशसर हे सहभागी झाले होते. त्याचं सूत्रसंचालन मीच केलं होतं. तेव्हा या दोघांसमोर माझी कला सादर करताना मी खूपच घाबरलो होतो. मी या दोघांकडे महान संगीतकार म्हणूनच बघत असल्याने आजही त्यांच्यासमोर कार्यक्रमाचं संचालन करताना आजही मला धडकी भरते. पण इतक्या वर्षांत आमच्यात एक फार छान नातं निर्माण झाल्यामुळे त्यांच्याबरोबर पुन्हा एकत्र काम करताना मला खूप आनंद होत आहे.