Join us

आदित्य नारायणचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार 'पंड्या स्टोअर' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 6:04 PM

Aditya Narayan : आदित्य नारायण ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका पंड्या स्टोअरच्या विशेष भागात खास उपस्थित राहणार आहे.

आदित्य नारायण ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका पंड्या स्टोअरच्या विशेष भागात खास उपस्थित राहणार आहे. २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ‘स्टार प्लस’वर हे विशेष भाग प्रसारित होणार आहेत. ‘पंड्या स्टोअर’ मालिकेच्या विशेष दुहेरी भागांमधल्या उपस्थितीविषयी आदित्यने आपले मनोगत व्यक्त केले.

‘पंड्या स्टोअर’ या मालिकेचे आगामी कथानक धवलभोवती फिरणार आहे. जीवन-मरणाशी लढा देणारा धवल नताशासोबत घरी परततो, या संबंधात हे कथानक असेल. त्याचे कुटुंबीय- धवलचे स्वागत करणार आहेत आणि एक खास पाहुणा धवलच्या घरी परतण्याची वाट पाहत आहे. बॉलिवूडचा युवा गायक आदित्य नारायण २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान संध्याकाळी ६ वाजता आणि नंतर संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणाऱ्या विशेष दुहेरी भागांमध्ये ‘पंड्या स्टोअर’ मालिकेत खास उपस्थित राहणार आहे. या मालिकेतील त्याच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होतील, यात शंकाच नाही! ‘पंड्या स्टोअर’ कुटुंबासोबत मंच शेअर करताना आदित्य नारायणचे जादूई सादरीकरण पाहणे ही प्रेक्षकांकरता एक दृक् मेजवानी असेल! गायक आदित्य नारायण धवल आणि नताशा यांना एकत्र आणून त्यांच्यात प्रेमाचे धागे विणले जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसते.

याबाबत आदित्य नारायण  म्हणाला, “पंड्या स्टोअर’ ही घरोघरी आवर्जून बघितली जाणारी लोकप्रिय टीव्ही मालिकांपैकी एक आहे, ज्या मालिकेला प्रेक्षकांचे अतोनात प्रेम मिळाले आहे आणि त्यातील पात्रे तर घराघरांत चांगलीच परिचयाची झाली आहेत. अशा उत्साहात, ‘पंड्या स्टोअर’ने एक हजार भागांचा मैलाचा दगड पूर्ण केला असून या मालिकेच्या प्रवासाचा  आणि २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत आठवड्याभराकरता दररोज संध्याकाळी ६ वाजता आणि संध्याकाळी ७.३० वाजता दाखवल्या जाणाऱ्या दुहेरी भागांत मी सहभागी होत आहे. हा माझ्याकरता थरारक अनुभव आहे. त्यांची कथा पडद्यावर जशी रंजक दिसते, तशीच कॅमेऱ्याच्या पलीकडेही या कलाकारांमधील भावनिक नातेसंबंध आश्चर्यकारक आणि खूप मजेदार आहेत! धवलचे घरी स्वागत करण्यासाठी आयोजित उत्सवात मी सहभागी होणार आहे. मकवाना कुटुंब आणि मी एकत्र येत आहोत, तेव्हा आमच्या आनंदात सहभागी होण्याकरता आम्ही तुम्हांला आमंत्रित करत आहोत. हा एक जादुई उत्सव असणार आहे. तो पाहण्याकरता जरूर सज्ज रहा!”

टॅग्स :आदित्य नारायण