अभिनेता आदित्य पांचोली आणि कंगना राणौत यांचा एक जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. अंधेरी न्यायालयाने मानहानी प्रकरणात कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना चार समन्स जारी केले आहेत. कंगनाने आदित्य पांचोलीवर बलात्कार आणि अत्याचाराचे आरोप केले होते. यानंतर आदित्याने याप्रकरणी कंगना व रंगोलीवर मानहानीचा दावा ठोकला होता. कंगना व तिच्या बहीणीचे सगळे आरोप खोटे असून मला जाणीवपूर्वक अडकवण्यात येत असल्याचा दावा त्याने केला होता. याचप्रकरणी अंधेरी न्यायालयाने कंगना व तिच्या बहीणीविरोधात चार समन्स जारी केलेत. त्यात कंगना आणि तिच्या बहिणीला 26 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी काल मंगळवारी कंगना मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात साक्ष देण्यासाठी पोहोचली.
काय आहे प्रकरणहे प्रकरण 13 वर्षे जुने आहे. कंगना बॉलिवूडमध्ये नवी असताना तिचे व आदित्यचे अफेअर होते आणि ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. यादरम्यान आदित्यने मारहाण व लैंगिक छळ केल्याचा कंगनाचा आरोप आहे. आदित्यची पत्नी जरीना वहाबलादेखील या प्रकरणाची संपूर्ण माहिती होती, असाही तिचा दावा आहे. आम्ही पती-पत्नीसारखे रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही घराचेही प्लानिंग करत होतो. तो माझ्या वडिलांच्या वयाचा होता. त्याने मला मारहाण केली. माझ्या डोक्यातून रक्त वाहत होते. मी केवळ 17 वर्षांची होते. मी सुद्धा सँडल काढून त्याच्या डोक्यावर मारली. त्याच्याही डोक्यातून रक्त येऊ लागले. यानंतर मी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला, असे कंगनाने म्हटले होते.याप्रकरणी आदित्यने 2017 मध्ये कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. काही दिवसांपूर्वी त्याने कंगनाविरोधात पोलिस तक्रारही दाखल केली होती.
मला अडकवण्याचा प्रयत्न - आदित्यमाझ्यावर खोटे आरोप लावण्यात येत असल्याचा आदित्यचा दावा आहे. अलीकडे मिड-डेला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणाला होता की, मी कंगनावर मानहाणीची तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीला परत घेण्यासाठी कंगनाच्या वकीलाने मला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि माज्याविरूद्ध खोटी तक्रार दाखल केली. माझ्यावर लावलेल्या आरोपांना काहीच तथ्य नाहीये.