Join us

आदित्य पांचोलीविरोधात मारहाण व शोषणाचा आरोप! १३ वर्षांपूर्वीची आहे घटना!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 11:46 AM

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एका वादात सापडला आहे. एका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीने आदित्यवर गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देदित्यच्या पत्नीला या सगळ्या घटनेबद्दल ठाऊक होते, असा दावा संबंधित तक्रारीत करण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एका वादात सापडला आहे. एका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीने आदित्यवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईच्या वर्सोवा पोलिसांना आदित्यच्या विरोधात अभिनेत्रीच्या बहिणीने ई-मेल तक्रार प्राप्त झाली आहे. संबधित तक्रारीत आदित्यवर मारहाण आणि शोषणाचा आरोप ठेवण्यात आला आहे. ही घटना सुमारे एक दशकापूर्वीची असल्याचे कळतेय.दरम्यान आदित्यने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मिड-डेशी बोलताना त्याने सांगितले की, अभिनेत्रीच्या वकीलाने माझ्याविरोधात बलात्काराचे खोटे प्रकरण दाखल करण्याची धमकी दिली.  मी अभिनेत्रीविरोधात अबु्र नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

पोलिसांनी गत रविवारी याप्रकरणी आदित्यची चौकशी केली. एका पोलिस अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, ई-मेलद्वारे तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित अभिनेत्रीशीही पोलिसांनी संपर्क केला. पोलिस अधिका-याने सांगितले की, ही घटना १३ वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला अनेक पुरावे गोळा करावे लागतील. आदित्यच्या पत्नीला या सगळ्या घटनेबद्दल ठाऊक होते, असा दावाही संबंधित तक्रारीत करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंची सखोल चौकशी केल्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू.

काय म्हणतो आदित्य  मी आधीच या अभिनेत्रीविरोधात अबु्रनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यानंतर अभिनेत्रीच्या वकिलाने याचवर्षी ६ जानेवारीला मला धमकी दिली. माझ्या अशिलाविरोधातील अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला नाही तर मी तुझ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, असे तो मला म्हणाला होता. १८ मिनिटांचे हे संभाषण मी रेकॉर्ड केले आहे. पुरावा म्हणून न्यायालय आणि पोलिसांना मी हे रेकॉर्डिंग दिले. हा माझ्याविरोधातील कट आहे. याचवर्षी २५ एप्रिलला वर्सोवा पोलिस माझ्या घरी एक नोटीस घेऊन आलेत आणि मला धक्का बसला. गत १२ मे रोजी मी यासंदर्भात पोलिसांना सविस्तर माहिती दिली. 

टॅग्स :आदित्य पांचोली