Join us

अनन्याशी ब्रेकअपनंतर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय आदित्य रॉय कपूर ? एकत्र स्पॉट झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 10:27 IST

ही अभिनेत्री अनन्याची चांगली मैत्रीणीदेखील आहे.

अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांनाट डेट करत होते. पण, गेल्या मार्च महिन्यातच त्यांचं ब्रेकअप झालं. अनन्यासोबत ब्रेकअप होताच आदित्यचं नाव बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्री जोडलं जात आहे. दिग्दर्शक अनुराग बसूच्या वाढदिवसाला दोघे एकत्र स्पॉट झाले. ही अभिनेत्री अनन्याची चांगली मैत्रीणीदेखील आहे. 

अलिकडेच दिग्दर्शक अनुराग बसूने आपला वाढदिवस साजरा केला. या पार्टीला काही मोजकेच कलाकार उपस्थित होते. यावेळी आदित्य या लोकप्रिय अभिनेत्री स्पॉट झाला. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नाही तर सारा अली खान आहे. साराशी आदित्यचं सुत जुळ्याचं बोललं जात आहे.   दोघेही सध्या 'मेट्रो... इन दिनों' या चित्रपटात काम करत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग करत आहे.

'मेट्रो... इन दिनों' हा सिनेमा अनुराग बासूच्या 2007 मध्ये आलेल्या 'लाइफ इन अ मेट्रो' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'मेट्रो इन दिनॉन'मध्ये अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेनशर्मा, अली फजल आणि फातिमा सना शेख हे कलाकार दिसणार आहेत. हा सिनेमा 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.  दरम्यान, काही दिवसांपुर्वीच अनन्या आणि सारा या दोघी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये सहभागी झाल्या होत्या. दोघी मैत्रीणी असून त्यांच्यात चांगलं बॉन्डिंग आहे.   

टॅग्स :आदित्य रॉय कपूरअनन्या पांडेसारा अली खानबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया