Join us

Adnan Sami : अदनान सामीचा शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशननंतर सोशल मीडियाला रामराम?, अलविदा पोस्टमुळे चाहते हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 3:59 PM

Adnan Sami: गायक अदनान सामीने आपल्या इन्स्टाग्रामवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या असून, ‘अलविदा’ म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रसिद्ध गायक अदनान सामी (Adnan Sami) सध्या गाण्यांव्यतिरिक्त त्याच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावरही तो खूप सक्रिय असतो. तो अनेकदा सोशल मीडियावर फॅमिली फोटो फॅन्ससाठी शेअर करत असतो. सोशल मीडियावर त्याचे ६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. चाहतेही त्याच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, गायकाचे इन्स्टाग्राम अकाउंट पूर्णपणे रिकामे दिसल्यामुळे अदनानच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. सध्या सिंगरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एकच पोस्ट दिसत आहे ज्यामध्ये 'गुडबाय' लिहिले आहे. या पोस्टमुळे चाहते प्रचंड नाराज झाले असून वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावत आहेत.

अदनान सामी अलीकडेच प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा त्याने कुटुंबासह त्याच्या सुट्टीतील जबरदस्त छायाचित्रे पोस्ट केली. या फोटोंमध्ये अदनान एकदम फिट दिसत होता. हे फोटो आता त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून गायब झाले आहेत. सध्या सिंगरच्या अकाउंटवर फक्त एक छोटासा व्हिडिओ दिसत आहे. ज्यामध्ये अलविदा लिहिलेले दिसत आहे. त्याच्या कॅप्शनमध्येही हेच लिहिले आहे.

अदनान सामीच्या अकाउंटवर सध्या दिसणारा व्हिडीओ अवघ्या काही तासांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. अशा स्थितीत 'गुडबाय' हा गायकाचा नवा प्रोजेक्ट असू शकतो, असा अंदाज बहुतेक जण व्यक्त करत आहेत. याआधीही अनेक सेलिब्रिटींनी असे पब्लिसिटी स्टंट केले आहेत. आता अदनानने हे काही गाण्यासाठी केले आहे की तो खरोखरच सोशल मीडिया सोडतोय, हे आगामी काळातच कळेल.

टॅग्स :अदनान सामीइन्स्टाग्राम