ज्युनिअर एनटीआरसोबत नाव जुळले अन् ‘बर्बाद’ झाले या अभिनेत्रीचे करिअर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 05:30 PM2020-05-20T17:30:41+5:302020-05-20T17:33:26+5:30

जाणून घ्या पडद्यामागची ही कथा...

affair rumours with jr ntr ended sameera reddys filmy career in tollywood-ram | ज्युनिअर एनटीआरसोबत नाव जुळले अन् ‘बर्बाद’ झाले या अभिनेत्रीचे करिअर!!

ज्युनिअर एनटीआरसोबत नाव जुळले अन् ‘बर्बाद’ झाले या अभिनेत्रीचे करिअर!!

googlenewsNext
ठळक मुद्दे2014 मध्ये समीराने बिझनेसमॅन अक्षय वर्देसोबत लग्न केले. आज समीरा आपल्या संसारात आनंदी आहे. 

साऊथ स्टार ज्युनिअर एनटीआर टॉलिवूडचा एक हँडसम स्टार आहे, यात शंका नाही. त्यामुळेच ज्युनिअर एनटीआरसोबत काम करण्याची संधी मिळणे हे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. पण या अभिनेत्रीचे करिअर केवळ ज्युनिअर एनटीआरसोबत नाव जुळल्यामुळे संपले. होय, आज ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस. तेव्हा जाणून घेऊ या काय आहे ही पडद्यामागची ही संपूर्ण कथा...

 ज्युनिअर एनटीआरसोबत असलेल्या रिलेशनशिपच्या अफवांमुळे या अभिनेत्रीचे करिअर संपले, त्या अभिनेत्रीचे नाव आहे, समीरा रेड्डी.

होय, एकेकाळी समीरा व ज्युनिअर एनटीआर यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, असे मानले जात होते. पण या अफेअरच्या चर्चा सुरु असतानाच समीराने अचानक ज्युनिअर एनटीआरसोबतचे सगळे संबंध तोडले. इतकेच नाही तेलगू सिनेमांनाही रामराम ठोकला.

समीराचे मानाल तर, तिच्यात आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यात काहीही नव्हते. दोघेही केवळ चांगले मित्र होते. समीरा इंडस्ट्रीत नवखी असताना ज्युनिअर एनटीआरने तिची बरीच मदत केली होती आणि अनेक गोष्टी शिकवल्या होत्या. पण अचानक दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आणि समीराने या सगळ्यांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

एका मुलाखतीत समीरा यावर बोलली होती. तिने सांगितले होते की, मी तेलगू इंडस्ट्रीत नवीन होते. कुणालाही फार ओळखत नव्हते. त्याकाळात ज्युनिअर एनटीआर माझा चांगला मित्र झाला. आम्ही फक्त चांगले मित्र होतो.पण अचानक आमच्या अफेअरच्या अफवा पसरवल्या जाऊ लागल्या. माझ्या घरापर्यंत या चर्चा आल्यात आणि यानंतर माझे टॉलिवूडमध्ये काम करणे बंद झाले. टॉलिवूडमध्ये मला एक चांगली अभिनेत्री म्हणून ओळखले जावे अशी माझी इच्छा होती. पण मला लोकांनी ज्युनिअर एनटीआरची कथिता प्रेमिका ठरवले होते. याचे मला दु:ख होते. मग मी सगळेच  मागे टाकून टॉलिवूडला कायमचे अलविदा म्हटले.

2014 मध्ये समीराने बिझनेसमॅन अक्षय वर्देसोबत लग्न केले. आज समीरा आपल्या संसारात आनंदी आहे. दोन मुलांची आई आहे़. ज्युनिअर एनटीआरही विवाहित आहे. त्याच्या पत्नीचे नाव लक्ष्मी प्रणीति आहे.
 

Web Title: affair rumours with jr ntr ended sameera reddys filmy career in tollywood-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.