Join us
Daily Top 2Weekly Top 5

ललित मोदींसोबतच्या नात्यावर अखेर २० तासांनंतर सुष्मिता सेननं केला मोठा खुलासा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 18:10 IST

Lalit Modi And Sushmita Sen: ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबतचे व्हॅकेशन्सचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि ते एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या नात्याची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

ललित मोदी (Lalit Modi) आणि सुष्मिता सेन (Sushmita Sen) त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले आहेत. १४ जुलै रोजी ललित मोदींनी सुष्मितासोबतचे बरेच व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले होते आणि ते एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले होते. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि ते चर्चेत आले. मात्र, आत्तापर्यंत ही मोठी बातमी पचवणे युजर्सना कठीण जात आहे. सुष्मिता सेन आणि ललित मोदी इटलीतील एका सुंदर बेटावर एकत्र व्हॅकेशनसाठी गेले होते. यानंतर ललित मोदी पुन्हा लंडनला गेले आणि सुष्मिता सेनसोबतचे फोटो पोस्ट केले. आता ललित मोदींच्या पोस्टनंतर २० तासांनंतर सुष्मिता सेननेही फोटोंवर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

ललित मोदींसोबतचे नाते समोर आल्यानंतर सुष्मिता सेनने पहिली पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या मुली, रेनी आणि अलिशासोबतचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की ती खूप आनंदी आहे. तिने लिहिले, 'मी सध्या माझ्या आनंदी ठिकाणी आहे. माझे लग्न झालेले नाही. अंगठी नाही. ते फक्त अपार प्रेम आहे.

सुष्मिता आणि ललित यांचे फोटो समोर आल्यानंतर आणि त्यांचे ट्विट वाचून सर्वजण चकित झाले. त्याचवेळी दोघांचे लग्न झाल्याचे काहींना समजले. सुष्मिताच्या हातात हिऱ्याची मोठी अंगठी दिसली. हे पाहून लोकांना अंदाज आला की दोघांची एंगेजमेंट झाली आहे. मात्र, काही ट्विटला उत्तर देताना ललित यांनी तसे नसल्याचे म्हटले होते. दोघेही सध्या एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचे लग्न झालेले नाही किंवा एंगेजमेंट झालेली नाही.

ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबत काढलेले अनेक फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत. ललित मोदींनी ट्विटमध्ये लिहिले की, 'कुटुंबियांसमवेत एका छान जागतिक दौऱ्यानंतर लंडनला परतलो. माझी सुंदर जोडीदार सुष्मिता सेन. माझ्या आयुष्याचा हा नवीन टप्पा सुरू करताना मला आनंद होत आहे.

कुटुंबियांनी दिली ही प्रतिक्रियासुष्मिता सेनचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र अद्याप या वृत्तावर मौन बाळगून आहेत. तिचा भाऊ राजीव सेनने सांगितले की, ही बातमी कळल्यानंतर त्यालाही आश्चर्य वाटले. त्याच वेळी, तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल म्हणाला की, सुष्मिता आणि ललित यांना एकटे सोडले पाहिजे आणि त्यांच्या आनंदात आनंदी राहावे. तर दुसरीकडे ललित मोदी यांचा मुलगा रुचिर मोदी याचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. कुटुंबाच्या वैयक्तिक विषयावर बोलायला तयार नसल्याचे रुचिरचे म्हणणे आहे. बिझनेस किंवा इतर काही असेल तर त्याबद्दल बोलता येईल, असे तो म्हणाला. 

टॅग्स :सुश्मिता सेनललित मोदी