ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - बॉलिवुडचा सुपरस्टार शाहरुख खानने कॉलेज सोडल्यानंतर तब्बल २८ वर्षांनी मंगळवारी दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये जाऊन ग्रॅज्युएशनची पदवी स्वीकारली.
हा माझ्यासाठी विशेष क्षण आहे. १९८८ साली मी कॉलेज सोडले त्यानंतर आज कॉलेजमध्ये आलो आहे. मला याप्रसंगी माझ्या मुलांची उणीव जाणवतेय. ते माझ्यासोबत आलेले नाहीत. त्यांना मला माझ्या कॉलेजचा प्रत्येक कोपरा दाखवायचा होता असे शाहरुखने पदवी स्वीकारताना सांगितले.
शाहरुखच्या पदवीदान सोहळयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी
कॉलेजमध्ये प्रवेश करणारी शाहरुखची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. असहिष्णूतेसंदर्भात शाहरुखने केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी एबीव्हीपीने आंदोलन केले.