सध्या साउथमधील लोकप्रिय सिनेमा 'कन्नप्पा'ची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा गेल्या काही महिन्यांपासून लोकांमध्ये उत्सुकतेचा विषय आहे. काहीच दिवसांपूर्वी 'कन्नप्पा'ची घोषणा करण्यात आली. सिनेमातील अक्षय कुमारचा भगवान शंकराचा लूक रिव्हिल करण्यात आला. त्यानंतर 'कन्नप्पा' सिनेमातील आणखी एक कलाकाराचा लूक आज रिव्हिल करण्यात आलाय. कपाळावर भस्म अन् हातात त्रिशूळ असणाऱ्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखलं?
'कन्नप्पा'मध्ये दिसणार हा अभिनेता
सोशल मीडियावर 'कन्नप्पा' सिनेमातील आणखी एका अभिनेत्याचा लूक रिव्हिल करण्यात आलाय. कपाळावर भस्म, हातात त्रिशूल आणि डोळ्यात आग असणारा हा अभिनेता भगवान शंकराच्या भूमिकेत दिसतोय. हा अभिनेता आहे प्रभास. 'कन्नप्पा' सिनेमातील प्रभासचा लूक ओळखताच येत नाहीये. अक्षय कुमारनंतर प्रभास या सिनेमात भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमाच्या कथेबद्दल सर्वांना उत्सुकता आहे.
कधी रिलीज होणार 'कन्नप्पा'?
'कन्नप्पा' सिनेमा हा साउथचा बिग बजेट सिनेमा आहे. रिपोर्ट्सनुसार हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ ला रिलीज होणार आहे. 'कन्नप्पा' हा एक काल्पनिक सिनेमा असून शिवभक्त कन्नप्पावर हा सिनेमा आधारीत आहे. या सिनेमात अक्षय कुमार झळकणार असून या सिनेमाच्या माध्यमातून खिलाडी तेलुगु सिनेमाइंडस्ट्रीत पदार्पण करतोय. प्रभासही या सिनेमात झळकणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला आहे.