अभिनेता सुनील बर्वेने चित्रपट, मालिका आणि रंगभूमी गाजवून प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण केली आहे. सध्या सुनीलचे अमर फोटो स्टुडिओ हे नाटक रंगमंचावर सुरू आहे. या नाटकाचा २५वा प्रयोग लवकरच होणार आहे. खरेतर सुबकचे प्रत्येक नाटक हे २५ प्रयोग झाले की बंद होते. पंचविसाव्या प्रयोगानंतर पुन्हा प्रयोग होत नाही. २५व्या प्रयोगाच्या दिवशी आम्ही कलाकार भारावून जायचो असे त्याने सोशल मीडियावर सुबोधने लिहिले आहे. आता अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचादेखील पंचविसावा प्रयोग होत आहे. मग तुम्ही म्हणाल की, हे नाटक आता रंगमंचाचा निरोप घेणार का? तर तसे आता होणार नाहीये. सुबकची इतक्या वर्षांची ही परंपरा अमर फोटो स्टुडिओने मोडून काढली आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता हे नाटक आता सुरुच राहणार असल्याने सुनीलला आनंद झाला आहे. तो सांगतोय, ''आता वेळ बदललीय, आधी पालक मुलांना नाटक दाखवायला आणायचे. पण आता मुलेच पालकांना नाटकाच्या प्रयोगांना घेऊन येत आहेत.'' असे सुनीलने सोशल मीडियावर लिहिले आहे.
अखेर सुबकची परंपरा मोडली
By admin | Published: October 29, 2016 3:39 AM