Join us

म्हणून 96 मुलींच्या ऑडिशन्सनंतर संजय जाधवची लकी गर्ल ठरली दीप्ती सती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 6:30 AM

आपल्या रोमँटिक कॉमेडी सिनेमांसाठी ओळखला जाणारा संजय जाधव ह्यावेळी कॉलेज तरूणांची धमाल फिल्म घेऊन येताना काहीसे बोल्ड झालेले दिसतोय.

ठळक मुद्दे 96 मुलींच्या ऑडिशन्स घेतल्या नंतर दिप्तीची निवड करण्यात आली आजपर्यंत मराठीत कधीही न पाहिलेला फ्रेश फेस ह्या भूमिकेला हवा होता - संजय जाधव

दुनियादारी, तुहिरे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा असे सुपरहिट सिनेमा देणारे ब्लॉकबस्टर फिल्ममेकर संजय जाधव येत्या 7 फेब्रुवारीला 'लकी' ही धमाल कॉमेडी फिल्म घेऊन येतोय. आपल्या रोमँटिक कॉमेडी सिनेमांसाठी ओळखला जाणारा संजय जाधव ह्यावेळी कॉलेज तरूणांची धमाल फिल्म घेऊन येताना काहीसे बोल्ड झालेले दिसतोय.

आत्तापर्यंत सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे, तेजस्विनी पंडित, अशा ब्युटिफुल हिरोइन्ससह सिनेमा करणारा संजय जाधव आता साउथ सेन्सेशन दिप्ती सतीला आपल्या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत लाँच करतोय. पण ह्यावेळी सई, तेजस्विनी सारख्या ‘फेव्हरेट’ हिरोइन्सना डावलून दिप्तीचीच निवड का केली? असं विचारल्यावर संजय जाधव म्हणाला, “कोणाला डावलण्यात आलं नाही आहे. सई,तेजस्विनी आणि ह्याअगोदर माझ्यासोबत काम केलेल्या सर्वच नायिका माझ्या फेव्हरेट आहेत आणि राहतील. पण आता सई किंवा तेजस्विनीला कॉलेजला जाणारी मुलगी दाखवलं तर ते त्यांच्या वयाला अनुरूप होणार नाही. ह्याअगोदर त्यांनी माझ्यासिनेमातच कॉलेज-गोइंग मुलींचे सिनेमे केले आहेत. मग त्यांच्या भूमिकांमध्येही तोच-तोपणा प्रेक्षकांना जाणवण्याची शक्यता आहे. आजपर्यंत मराठीत कधीही न पाहिलेला फ्रेश फेस ह्या भूमिकेला हवा होता. त्यामुळे दिप्तीची निवड करण्यात आली.”

दिप्तीची निवड करण्याअगोदर संजय जाधव ह्यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये जवळ-जवळ 96 मुलींच्या ऑडिशन्स झाल्या होत्या. आणि मग दिप्तीची निवड झाली, असं सूत्रांनूसार समजतंय. ह्या बातमीला दुजोरा देताना संजय जाधव म्हणतो, “हो, आम्ही खूप मुलींच्या ऑडिशन्स घेतल्या. पण काही-ना-काही कारणांनी त्या मुली ‘जिया’च्या भूमिकेला फिट बसत नव्हत्या. पण एकेदिवशी माझ्या असिस्टंटने मला जॅग्वार फिल्म दाखवली. आणि मला जिया सापडली. “

चित्रपटाचे निर्माते सूरज सिंग ह्याला दूजोरा देताना म्हणतात, “दिप्तीचे फिचर्स लक्षवेधक आहेत. ती जेवढी सुंदर, बबली, निरागस दिसते. तेवढीच ती हुशार आणि शार्पही आहे. जियासुध्दा अशीच आहे सोशल मीडियावर एक्टिव्ह असलेल्या ह्या आजच्या मुलीला आत्मभानही आहे. मॉर्डन होणं म्हणजे स्वैराचारी असणे नाही, हे मानणारी जिया आहे. आणि ऑडिशन आणि स्क्रिनटेस्टमधून दिप्तीमध्ये आम्हांला जियाचे हे गुण दिसून आले. “  

बिनधास्त  जियाविषयी दिप्ती सांगते, “कॉलेजविश्व आणि आजच्या तरूणाईची ही फिल्म आहे. हा कॉमेडी ड्रामा आहे. तुम्ही खूप एन्जॉय कराल अशी फिल्म आहे. व्हॅलेंटाईन महिन्यात येणारी ही फिल्म आपल्या कॉलेजमध्ये मुलीला प्रपोज करू इच्छिणा-या प्रत्येक वयोगटातल्या मुलाला आपलीशी वाटणारी आहे.”

 'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. 

टॅग्स :संजय जाधवलकी