बॉलिवूडचा क्रिश म्हणजेच अभिनेता हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन क्रिश ४ चित्रपटाच्या कामात खूप बिझी होते जेव्हा त्यांना कर्करोग झाल्याचं समजलं. राकेश रोशन यांच्या गळ्यात Squamous Cell Carcinomaची तक्रार होती. त्यांना कर्करोगाची नुकतीच सुरूवात झाली असली तरी त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रोजेक्ट्सचं काम थांबवावं लागलं. त्यामुळे त्यांनी क्रिश ४ चित्रपटाच्या प्रदर्शन पुढे ढकललं. यावर्षाच्या सुरूवातीला राकेश रोशन यांनी कॅन्सरची सर्जरी केली. सर्जरी यशस्वी झाल्यानंतर ते आरामासाठी ब्रेकवर होते. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राकेश रोशन यांनी क्रिश ४ चित्रपटाच्या स्क्रीप्टवर पुन्हा काम सुरू केले आहे.
कॅन्सरवर मात केल्यानंतर आता हा अभिनेता काम करण्यासाठी झाला सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 7:42 PM