Join us

'भूल भूलैय्या 3'नंतर कार्तिक आर्यनच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल येणार? अभिनेत्याने दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 12:48 IST

कार्तिक आर्यनचा 'भूल भूलैय्या 3' सिनेमा चांगलाच गाजतोय. या सिनेमानंतर कार्तिकच्या आणखी एका सिनेमाचा सीक्वल भेटीला येणारेय

कार्तिक आर्यनचा 'भूल भूलैय्या 3' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात कार्तिकसोबत विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, विजय राज, संजय मिश्रा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. कार्तिकच्या या सिनेमाने मल्टिस्टारर 'सिंघम अगेन'ला पछाडलं. इतकंच नव्हे तर कार्तिकच्या 'भूल भूलैय्या 3'ने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिकची कमाई केलीय. अशातच कार्तिकच्या गाजलेल्या आणखी एका सिनेमाचा सीक्वल भेटीला येणार असल्याची शक्यता आहे.

कार्तिकच्या या सिनेमाचा सीक्वल येणार?

कार्तिकचा काही वर्षांपूर्वी एक सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. त्या सिनेमाचं नाव 'फ्रेडी'. २०२२ साली हा सिनेमा ओटीटीवर रिलीज  झाला. या सिनेमाला २ वर्ष झाल्यानिमित्ताने कार्तिकने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या सिनेमातील भूमिकेसाठी कार्तिकने १४ किलो वजन वाढवलं होतं. कार्तिकने खास पोस्ट केल्याने फ्रेडीचा सीक्वल अर्थात 'फ्रेडी 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अर्थात याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

कार्तिकचं वर्कफ्रंट

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर यावर्षी कार्तिकचे दोन सिनेमे रिलीज झाले. यापैकी एक म्हणजे कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चँपियन' आणि दुसरा म्हणजे दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज झालेला 'भूल भूलैय्या 3'. चंदू चँपियनला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळाला. परंतु या सिनेमात कार्तिकने साकारलेल्या भूमिकेचं आणि त्याने घेतलेल्या मेहनतीचं खूप कौतुक झालं. तर दुसरीकडे कार्तिकचा 'भूल भूलैय्या 3' मात्र चांगलाच सुपरहिट झाला. कार्तिक सध्या आगामी 'आशिकी 3' सिनेमाच्या तयारीला लागलाय.

टॅग्स :कार्तिक आर्यनभूल भुलैय्या