Bigg Boss : अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा आणि सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणजे बिग बॉस. सध्या 'बिग बॉस ओटीटी'चा तिसरा सीझन सुरू आहे. तर 'बिग बॉस मराठी ५' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता 'बिग बॉस हिंदी'च्या नव्या सीझनची चर्चा रंगू लागली आहे. 'बिग बॉस १८' साठीही प्रेक्षक उत्सुक आहेत. 'बिग बॉस ओटीटी ३'नंतर लगेचच बिग बॉस हिंदीचा पुढचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'बिग बॉस १८' बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 'बिग बॉस ओटीटी'चा फिनाले पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच 'बिग बॉस १८' सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 'बिग बॉस १८' मधील काही स्पर्धकांची नावंही समोर आली आहेत. या सीझनमध्ये अभिनेता शोएब इब्राहिम दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
'द खबरी' ने दिलेल्या रिपोर्टनुसार, शोएब इब्राहिमला 'बिग बॉस'च्या टीमकडून संपर्क करण्यात आला आहे. याशिवाय अभिनेत्याही ग्रीन सिग्नल दिल्याचं समजत आहे. त्यामुळे 'बिग बॉस १८' मधील पहिल्या स्पर्धकाचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. याआधीही शोएब 'बिग बॉस'च्या घरात दिसला होता. 'बिग बॉस १२' या सीझनचा तो विजेता होता. आता पुन्हा तो 'बिग बॉस'च्या घरात दिसण्याच्या शक्यता आहेत. शोएबने 'ससुराल सिमर का', 'इश्क मे मरजावा', 'अजूनी' या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'नच बलिए ८' आणि 'झलक दिखलाजा ११' या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाला होता.
'बिग बॉस १८' ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'बिग बॉस ओटीटी ३'चा ग्रँड फिनाले ४ ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर 'बिग बॉस'च्या नव्या सीझनसाठी तयारी करण्यात येणार आहे. सध्या 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये रणवीर शौरी, विशाल कटारिया, अरमान मलिक, कृतिका मलिक, लव कटारीया, शिवानी कुमारी, सना मकबूल, नैजी आणि साई केतन हे कंटेस्टंट आहेत.