Join us  

बॉक्स ऑफिसनंतर "भल्लालदेव" गाजवणार छोटा पडदा, टीझर रिलीज

By admin | Published: June 15, 2017 12:28 PM

बाहुबली चित्रपटात कपटी भल्लालदेवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबत्ती लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - बाहुबली चित्रपटात कपटी भल्लालदेवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबत्ती लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर राणा डग्गुबत्तीने आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे. मालिकेच्या माध्यमातून राणा डग्गुबत्ती चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. राणा डग्गुबत्तीने स्वत: ट्विटरवरुन आपल्या नव्या टीव्ही शोबाबत माहिती दिली आहे. तसंच ट्विटरच्याच माध्यमातून आपल्या या नव्या मालिकेचा टीझरही लॉन्च केला आहे.
 
"तुमच्या आवडत्या स्टार्ससोबत मैत्री सेलिब्रेट करण्यासाठी तुमच्या घरी येत आहोत, नंबर 1 यारी विथ राणा" असं ट्विट करत राणा डग्गुबत्तीने टीझर लाँच केला आहे. "मला नेहमीच टीव्ही म्हणजेच छोट्या पडद्याचं आकर्षण राहिलं आहे. पहिल्यांदाच टीव्ही होस्ट म्हणून थेट तुमच्या घरी येत आहे", असंही राणाने म्हटलं आहे.
 
 
बाहुबली चित्रपटामुळे प्रभास आणि राणा डग्गुबत्तीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. दोघांच्याही आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रभास सध्या "साहो" चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तर राणा डग्गुबत्तीचा आगामी चित्रपट ‘नेने राजू, नेने मंत्री’ही लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात राणा डग्गुबत्ती राजकीय नेत्याच्या भूमिकेत असेल