देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. या कोरोनाच्या विळख्यात सेलिब्रेटीही अडकताना दिसत आहेत. आता आणखी एक सेलिब्रेटीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही सेलिब्रेटी म्हणजे हिना खान. हिना वडिलांच्या निधनानंतर मुंबईत परतली होती. हिना खानने सोशल मीडियावर याबद्दल सांगितले आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हिना खानने सांगितले की ते प्रत्येक गोष्टींची काळजी घेते आहे आणि तिने कोणत्याही कठीण काळात सुरक्षित राहण्यासाठी सांगितले आहे. हिना खानने पोस्ट करत सांगितले की, मी आणि कुटुंबाच्या या कठीण काळात मी कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे आणि सर्व प्रकारची काळजी घेते आहे. मला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. सुरक्षित रहा आणि आपली काळजी घ्या.