Join us

दीपिकानंतर क्रिती सेनॉनचं बॉलिवूडमधील नेपोटिझमवर थेट वक्तव्य, म्हणाली, "स्टारकिडला लाँच करण्याबरोबरच..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 8:51 AM

क्रितीने पहिल्यांदाच नेपोटिझम आणि स्टारकिडवर भाष्य केलं आहे. दीपिका पादुकोणनंतर आता नेपोटिझमबद्दल क्रितीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. 

क्रिती सेनॉन ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. हिरोपंती या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटामुळे क्रितीला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनेक सुपरहिट चित्रपटांत क्रिती दिसली. बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नसलेल्या क्रितीने पहिल्यांदाच नेपोटिझम आणि स्टारकिडवर भाष्य केलं आहे. दीपिका पादुकोणनंतर आता नेपोटिझमबद्दल क्रितीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. 

क्रितीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेपोटिझमवर उघडपणे भाष्य केलं. वोगला दिलेल्या मुलाखतीत क्रिती म्हणाली, "बाहेरुन येणाऱ्या कलाकारांसाठीही आपण सारख्याच संधी निर्माण केल्या तर त्यांच्यासाठी सिनेसृष्टीत काम करणं जास्त सोपं होईल. जर तुम्ही स्टारकिडला लाँच करत असाल, तर टॅलेंट असलेल्या एखाद्या बाहेरच्या कलाकाराही संधी मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. आजकाल प्रेक्षकही स्टार असलेल्या कलाकारांपेक्षा टॅलेंट असलेल्या कलाकारांना बघणं पसंत करतात." 

दरम्यान, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'गणपत'मध्ये क्रिती सेनॉन दिसली होती. या चित्रपटात तिने टायगर श्रॉफबरोबर स्क्रीन शेअर केली होती. क्रिती लवकरच 'द क्रू' आणि 'हाऊसफूल ५' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

नेपोटिझमवर दीपिका पादुकोण काय म्हणाली? 

"माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. एक अशा क्षेत्रात नाव कमावण्यासाठी प्रयत्न करणं, जिथे तुम्हाला कोणीच ओळखत नाही, हे कठीण काम आहे. आजकाल नेपोटिझम नावाची नवी गोष्ट लोकांनी सुरू केली आहे. पण, ही गोष्ट आधीदेखील होती, आताही आहे आणि या पुढेदेखील असणार आहे." 

टॅग्स :क्रिती सनॉनदीपिका पादुकोण