आयुषमान खुरानाचे कुटुंब सध्या कठीण परिस्थितून जात आहे. गेल्या महिन्यात त्याच्या वडिलांचं निधन झालं. खुराना कुटुंब या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, आयुषमान त्याच्या कुटुंबासह विमानतळावर दिसला. विमानतळावर आयुषमान आणि अपारशक्ती खुराना त्यांच्या आईसोबत दिसले. यादरम्यान दोघेही त्यांची आई पूनम यांची विशेष काळजी घेताना दिसले.
आईची काळजी घेताना दिसले आयुषमान-अपारशक्तीआयुषमान खुराना सोमवारी रात्री त्याच्या कुटुंबासह विमानतळावर दिसला. यादरम्यान, आयुषमानने फिकट हिरव्या रंगाचे टी-शर्ट, सनग्लासेस आणि मास्क घातला होता, तर अपारशक्तीने निळ्या टी-शर्टसह क्रीम जॅकेट आणि मॅचिंग हुडी घातली होती. अपारशक्ती आणि आयुषमना आईचा हात धरुन तिची काळजी घेताना दिसले.
आयुषमानने लिहिलेली भावूक पोस्ट वडिलांच्या निधनानंतर आयुषमानने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने आईच्या जबाबदाऱ्यांबद्दल सांगितले. त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'आईची काळजी घ्यायची आहे आणि कायम तिच्यासोबत राहायचं आहे. वडिलांसारखं बनायला आपल्या वडिलांपासून खूप लांब जावं लागतं. पहिल्यांदाच असं वाटत आहे की, बाबा खूप लांब आणि आमच्या खूप जवळ आहेत.' याचबरोबर आयुषमानने त्याच्या वडीलांचे आभारही मानले आहेत.
आयुषमान खुरानाचे वडील पी. खुराना यांचं १९ मे २०२३ला निधनं झालं. चंदीगड येथील रुग्णालयात उपचार दरम्यान ह्रदयविकारच्या झटक्यानं निधन झालं. ते प्रसिद्ध ज्योतिषी होते, त्यांनी या क्षेत्रात सुमारे 34 पुस्तके लिहिली आणि खूप प्रसिद्धी मिळवली. पी. खुराणा यांनाही वास्तुशास्त्राचे चांगले ज्ञान होते.