Join us

मलायका अरोरानंतर अर्जुन कपूरची कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह, शेअर केला अनुभव

By तेजल गावडे | Published: October 07, 2020 1:14 PM

जवळपास एक महिन्यानंतर अर्जुनची कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. जवळपास एक महिन्यानंतर अर्जुनची कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. कोरोनाच्या रिपोर्टबद्दल सांगताना अर्जुन कपूरने चाहत्यांना कोरोनापासून स्वःताला सुरक्षित ठेवण्यासाठी सल्ला दिला आहे. तसेच चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी आभारही मानले आहेत. तर त्याचे चाहते त्याच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत.

अर्जुन कपूरने इंस्टाग्रामवर लिहिले की, हॅलो, तुम्हाला सांगायला मला आनंद होतो आहे की माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मला खूप चांगले वाटत आहे आणि पूर्णपणे बरा झालो आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रार्थनेसाठी आभार. हा व्हायरस खूप भयानक आहे, त्यासाठी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की कोरोना व्हायरसचा प्रत्येक वयाच्या व्यक्तीवर परिणाम होतो.

अर्जुन कपूरने पुढे पोस्टमध्ये लिहिले की, डेंजरस व्हायरसची जोखीम लक्षात घेऊन तुम्ही मास्कचे महत्त्व समजा. बाहेर प्रत्येक वेळी मास्क घालून रहा. अर्जुन कपूरने बरे वाटल्यानंतर पोस्टमध्ये बीएमसीचे आभारही मानले आहेत आणि त्या सर्व व्यक्तींचे आभार मानले जे कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

अर्जुन कपूरने ६ सप्टेंबरला सोशल मीडियावर पोस्ट लिहून कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली. अर्जुन कपूरने लिहिले होते की, ही माझी जबाबदारी आहे की माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी ठीक आहे आणि काहीच लक्षण नाही आहेत. या पोस्टनंतर तिचे चाहते हैराण झाले होते आणि तो लवकर बरा होण्यासाठी करत होते. 

मलायकाने कोरोनातून बरी झाल्यावर तिचा अनुभव शेअर केला होता. मलायकाने कोरोनातून बरी झाल्याची बातमी इन्स्टाग्रामवर दिली होती. तिने लिहिले होते की, रूमच्या बाहेर निघणेही आउटींग करण्यासारखं आहे.

टॅग्स :अर्जुन कपूरकोरोना वायरस बातम्या