Join us  

 सगळे काही हॅपी हॅपी हवे...! रणबीर कपूरसोबतच्या लग्नावर पहिल्यांदा बोलली आलिया भट्ट!! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:21 PM

दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे लग्न झालेय. यानंतर पुढचा क्रमांक आहे तो प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांचा. प्रियांका व निक लवकरच जोधपूर येथे लग्न करणार आहेत. बॉलिवूडच्या या वेडिंग सीझनमध्ये आणखी एका कथित कपलच्या लग्नाची चर्चा रंगली आहे

ठळक मुद्देबॉलिवूडच्या या वेडिंग सीझनमध्ये आणखी एका कथित कपलच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. होय, हे कपल म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. आलिया व रणबीर कथितरित्या एकमेकांना डेट करताहेत आणि लवकरच लग्न करणार, अशी चर्चा आहे. पण आलियाचे मानाल तर या लग्नाला अद्याप वेळ आहे.

दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे लग्न झालेय. यानंतर पुढचा क्रमांक आहे तो प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांचा. प्रियांका व निक लवकरच जोधपूर येथे लग्न करणार आहेत. बॉलिवूडच्या या वेडिंग सीझनमध्ये आणखी एका कथित कपलच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. होय, हे कपल म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. आलिया व रणबीर कथितरित्या एकमेकांना डेट करताहेत आणि लवकरच लग्न करणार, अशी चर्चा आहे. पण आलियाचे मानाल तर या लग्नाला अद्याप वेळ आहे.

होय, आलियाने पहिल्यांदा रणबीरसोबतच्या लग्नाच्या चर्चेवर चुप्पी सोडत एक नवा खुलासा केला आहे. अलीकडे ‘लक्स गोल्डन रोज अवार्ड्स 2018’मध्ये आलियाने हजेरी लावली. यावेळी आलियाला तिच्या लग्नाबद्दल छेडण्यात आले. साहजिकचं आलियाने अतिशय शिताफीने उत्तर दिले. ‘लोक माझ्या लग्नासाठी उतावीळ झाले असतील तर त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. कारण माझ्या मते, क्लायमॅक्स चांगला असायला हवी.  एंडिंगही हॅपी व्हायला हवी,’ असे आलिया म्हणाली.

आलियाने आपल्या लग्नाच्या प्रश्नावर थेट बोलणे टाळले. पण प्रियांका चोप्राच्या लग्नाबद्दल मात्र ती भरभरून बोलली. प्रियांकाच्या लग्नासाठी मी कमालीची उत्सूक आहे. तिला नववधूच्या पोशाखात पाहण्यासाठी मी अधीर झाले आहे. मी तिची खूप मोठी चाहती आहे. तिचे लग्न तिच्या इतकेच शानदार असेल. ती जगातील सर्वात सुंदर वधू बनणार, असे आलिया म्हणाली.गेल्या काही दिवसांपासून आलिया व रणबीरच्या प्रेमाच्या चर्चा जोरात आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर दोघेही अनेकदा एकत्र दिसलेत.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरदीप- वीरप्रियंका चोप्रा