Join us

लग्नानंतर नुपूर शिखरे आणि आमिरची लाडकी लेक या ठिकाणी गेले हनीमूनला, आयराने पतीसोबतचे फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 4:43 PM

Ira Khan-Nupur Shikhare : आधी कोर्ट मॅरेज आणि नंतर उदयपूरमध्ये लग्न केल्यानंतर आमिर खानची मुलगी आयरा खान पती नुपूर शिखरेसोबत हनीमूनला गेली आहे.

आमिर खान(Aamir Khan)ची मुलगी आयरा खान(Ira Khan)ने नुकतेच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न केले. या जोडप्याने यापूर्वी मुंबईत कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर या जोडप्याने जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. यानंतर आमिर खानने १३ जानेवारीला मुंबईत आपल्या मुलीच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. अखेर आता नवविवाहित जोडपे त्यांच्या हनीमूनसाठी रवाना झाले आहेत. हे जोडपे हनीमूनसाठी बाली येथे पोहोचले आहे. आयराने तिच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर करून तिच्या हनीमूनची माहिती दिली आहे. तिने लिहिले की, "ती आणि नुपूर त्यांच्या मार्गावर आहेत आणि इमिग्रेशन लाइनमधून एकत्र गेले."

आयराने नुपूरसोबतचे विमानतळावरील अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तो एअरपोर्ट लाउंजमध्ये सेल्फी काढताना दिसत आहे. दुसर्‍या फोटोत, दोघे त्यांच्या हनीमूनसाठी बालीला जात असताना विमानात कोल्डड्रिंकचा आनंद घेताना दिसत आहेत. यादरम्यान आयराने राखाडी रंगाच्या टॉपवर ग्रे जॅकेट घातलेले दिसले, तर नुपूरने निळ्या टीशर्टवर काळ्या रंगाचे जॅकेट घातले.

आधी कोर्ट मॅरेज आणि नंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्नआमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी आयरा खानने १० जानेवारी रोजी उदयपूरमध्ये तिची दीर्घकाळाची बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ख्रिश्चन पद्धतीने लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. यापूर्वी या जोडप्याने ३ जानेवारीला मुंबईत रजिस्टर पद्धतीने विवाह केला होता. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल झाले.

टॅग्स :इरा खानआमिर खान