Join us

लग्नानंतर सुरुची अडारकरचा वर्क मोड ऑन; नव्या मालिकेतील फर्स्ट लूक व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 12:25 IST

Suruchi adarkar: झी मराठीवरील एका गाजलेल्या मालिकेत ती झळकणार आहे.

'का रे दुरावा' या गाजलेल्या मालिकेतून  घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुरुची अडारकर. काही दिवसांपूर्वीच सुरुचीने अभिनेता पियुष रानडे  याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच आता लग्नानंतर तिने पुन्हा एकदा तिचा फोकस करिअरकडे केला आहे. सुरुची लवकरच एका गाजलेल्या मालिकेत झळकणार आहे.

'का रे दुरावा' या मालिकेत अदिती खानोलकर ही भूमिका साकारुन सुरुची घराघरात पोहोचली. यानंतर तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे आदिती लवकरच झी मराठीवरील एका लोकप्रिय मालिकेत एन्ट्री करणार आहे. या मालिकेतील तिचा फर्स्ट लूक सुद्धा समोर आला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या सुरुचीच्या नव्या लूकचे काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यावर सुरुची कोणत्या मालिकेत झळकणार हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तसंच तिचा लूक पाहता ती 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. या संबंधित तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सुद्धा एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परंतु, या मालिकेत ती नेमकी कोणती भूमिका साकारणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :सुरुची आडारकरझी मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार