गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी राखी सावंतचे आदिल दुर्राणीसोबच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. तर दुसरीकडे काल राखीला अंबोली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, आता राखी सावंत पती आदिलसोबत उमराहसाठी जाणार आहे. या संदर्भात स्वत: राखी सावंतने माहिती दिली आहे.
या संदर्भातील खुलासा राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांनी नुकताच एका मुलाखतीत केला आहे. 'माझ्यासाठी आणि आदिलसाठी उमराहला जाणं खूप महत्त्वाचं आहे. तिथं कोणाचं नातं पक्कं झालं तर जगात ते कुणीही तोडू शकत नाही, असं राखी सावंत म्हणाली. या व्हिडीओत आदिल देखील राखी सावंतला उमराहसाठी जाण्यास सहमती देताना दिसत आहे.
Bollywood : यावर्षी तरी 'बॉलिवूड'चं बुडतं जहाज वर येणार का ? आगामी चित्रपटांकडून आहे आशा
राखी सावंतची आई सध्या खूप आजारी आहे. त्यांना कॅन्सर झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर राखी सावंत पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेली होती. राखी सावंत हिजाब परिधान केलेला पोलीस ठाण्यात दिसली. अभिनेत्री पोलीस ठाण्यामधून बाहेर पडताच ती थेट आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली. राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून आदिलबाबत चर्चेत आहे. दररोज या दोघांचे एकत्रित व्हिडीओ समोर येत आहेत.
उमराह काय आहे?
मक्कामधील हरम शरीफ यांच्या यात्रेला उमराह म्हटलं जातं. अरबी भाषेत उमराहचा अर्थ ‘लोकसंख्या असलेल्या ठिकाणाचं दर्शन’. ही एक धार्मिक यात्रा आहे. मुस्लीम समाजात आपल्या गुन्ह्यांची/चुकांची माफी मागण्याची संधी उमराहमध्ये मिळते. मुस्लीम समाजात असं मानलं जातं की, उमराह केल्यानंतर संबंधित व्यक्ती त्याच्या पापातून मुक्त होते.